islampur news : कृषि पंपाना मीटर बसविण्याचा निर्णय रद्द करावा, अन्यथा आंदोलन : राज्य सरकारने राज्यातील सहकारी पाणी पुरवठा संस्था व शेतकऱ्यांच्या व्यक्तिगत कृषीपंपांना मीटर बसविण्याचा निर्णय स्थगित ठेवून येत्या ५ जानेवारीपर्यंत आम्हास चर्चेस वेळ द्यावा. अन्यथा आम्ही सांगली,सातारा, कोल्हापूर,व पुणे जिल्ह्यातील शेतकरी कोल्हापूर येथे तीव्र आंदोलन करू,असा इशारा श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष डॉ.भारत पाटणकर यांनी पेठ (ता.वाळवा) येथील चार जिल्ह्यातील सर्व पक्षीय शेतकऱ्यांच्या मेळाव्यात बोलताना दिला. सहकारी व खाजगी पाणी पुरवठा योजनांना मीटर बसविण्याच्या निर्णयास स्थगिती देऊन टेंभू,ताकारी-म्हैसाळसारख्या २३ सरकारी पाणी योजनांना मीटर बसवून त्याचा अभ्यास करण्याचा निर्णय अप्पर सचिवांशी ६ जून २०२४ रोजी झालेल्या बैठकीत झाला होता. मग सचिवांनी मीटर बसविण्याचा आदेश कसा काढला? असा सवालही त्यांनी केला.
islampur news : कृषि पंपाना मीटर बसविण्याचा निर्णय रद्द करावा, अन्यथा आंदोलन
पेठ येथील जनाई हॉलमध्ये महाराष्ट्र राज्य इरिगेशन फेडरेशनने अन्यायी मीटर बसविण्याच्या जाचक अटी विरोधात चर्चा करून आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी सांगली,कोल्हापूर, सातारा व पुणे जिल्ह्या तील सर्वपक्षीय शेतकरी मेळाव्याचे आयोजन केले होते. या मेळाव्यात डॉ.पाटणकर बोलत होते. आ.अरुणअण्णा लाड,माजी आ.संजय बाबा घाटगे,फेडरेशनचे राज्य कार्याध्यक्ष आर.जी. तांबे,सांगली जिल्हा उपाध्यक्ष जे.पी. लाड, माजी जि.प.सदस्य रणधीर नाईक, कोल्हापूर जिल्ह्याचे भारत पाटील,चंद्रकांत पाटील,सातारा जिल्हाध्यक्ष प्रकाश पाटील, पुणे जिल्ह्याच्या एम.जी.शेलार,दिलीप जगताप,राजारामबापू साखर कारखान्याच्या इरिगेशन समितीचे अध्यक्ष प्रदीपकुमार पाटील,माजी उपाध्यक्ष विश्वासराव पाटील प्रामुख्याने उपस्थित होते.
डॉ.पाटणकर म्हणाले,राज्य शासनाने सहकारी व खाजगी पाणी पुरवठा योजनांना मीटर बसविण्याचा निर्णय घेतला असून शासन स्वखर्चाने मीटर बसविणार आहे. त्याची वसुली शेतकऱ्यांच्या पुढील ३ पाणी बिलातून केली जाणार आहे. आपण मे २४ मध्ये कोल्हापूर येथे तीव्र आंदोलन केल्या नंतर जून २४ मध्ये अप्पर सचिव दीपक कपूर यांच्याशी बैठक झाली. या बैठकीमध्ये शासनाच्या निर्णयास स्थगिती देत सरकारी २३ पाणी पुरवठा योजनांवर मीटर बसवून त्याचा अभ्यास करण्याचा निर्णय करण्यात आला. या निर्णयाचा सचिव संजय बेलसरे यांना विसर पडला काय? ऊस पिकाची पाणी पट्टी वसुली साठी अर्ज लिहून घेतले जात आहेत. माझ्या पाणी पट्टीची रक्कम माझ्या ऊस बिलातून परस्पर घेण्यास माझा सहमती असून त्यास माझा कोणताही आक्षेप रहाणार नाही.
यातून पाटबंधारे विभाग कितीही पाणी पट्टी वसूल करू शकते. शेतकऱ्यावर अस्मानी संकटे येत असून जोपर्यत शेतकऱ्यांना उत्पादन खर्चावर आधारित भाव नाही, तोपर्यंत हा निर्णय स्थगित ठेवावा. सध्यातरी आम्ही कोणत्याही परिस्थितीत मीटर बसवू देणार नाही.
आ.अरुणआण्णा लाड म्हणाले, आपणास आंदोलनाशिवाय काहीच मिळत नाही. आता आपण सर्वांनी संघटीत लढा देण्याशिवाय पर्याय नाही. शेती मालाला हमीभाव दिला जात नाही. शेतकऱ्यांवर सातत्याने अन्याय केला जात आहे. आपण तो किती दिवस सहन करणार? राज्यातील,देशातील उद्योगपतींना सर्व सोई-सुविधा देण्याचे काम सरकार करीत आहे.
यावेळी रणधीर नाईक,विश्वासराव पाटील,रामभाऊ थोरात,विनायक शिंदे, सिकंदर मुल्ला,दिलीप जगताप,भास्कर चौगुले,गणेश शेवाळे,लालासाहेब मोरे,जे. एस.पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले.
प्रारंभी प्रदीपकुमार पाटील यांनी स्वागत, तर जे.पी.लाड यांनी प्रास्ताविक केले. संचालक वैभव रकटे यांनी आभार मानले.
याप्रसंगी सभापती राजेंद्र सुर्यवंशी,सुभाष शहापूरे (शिरोळ),बाबुराव लगारे,रामभाऊ थोरात (कवठेएकंद),सहयाद्रीचे माजी संचालक निवास पाटील,बाबासाहेब मोरे,
माजी संचालक पै.शिवाजीराव साळुंखे, संचालक वैभव वसंतराव रकटे,जुनेखेडचे धनाजी पाटील,जलसिंचन अधिकारी जे.बी.पाटील,शहाजी पाटील, बाबासो जाधव यांच्यासह चार जिल्ह्यातील विविध सहकारी पाणीपुरवठा संस्थांचे अध्यक्ष,उपाध्यक्ष व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.