sangli local news : कचरा डेपोने मोकळा श्वास घेतल्याने समडोळीतील कचरो डेपोजवळील शेतीचे दर वाढले महापालिका क्षेत्रातील कचर्याचे संकलन करायचे आणि ते समडोळी व बेडग डेपोवर डंपिंग करायचे, असा प्रकार गेल्या 35 वर्षांपासून सुरू होता. मात्र हा प्रकार आता संपला आहे. दोन्ही डेपोंवर झिरो कचरा शिल्लक मोहिम मनपाची यशस्वी झाली आहे. त्यामुळे कचरा डेपो देखील आता मोकळा श्वास घेऊन लागले आहेत. यामुळे आसपासच्या जमिनीचे दर आता गगनाला भिडले असून 40 एकराचे प्लॉटिंग पडले आहे.
sangli local news : कचरा डेपोने मोकळा श्वास घेतल्याने समडोळीतील कचरो डेपोजवळील शेतीचे दर वाढले
सांगलीतील कचरा समडोळी हद्दीतील डेपोवर तर मिरज व कुपवाडचा कचरा बेडग हद्दीतील डेपोवर डंपिंग केला जात होता. गेल्या तीस वर्षांत समडोळी डेपोवर सहा लाख 54 हजार घनमीटर तर बेडग डेपोवर तीन लाख सात हजार घनमीटर असा नऊ लाख 61 घनमीटर कचरा पडून होता.
डेपो परिसरात कचर्यामुळे दुर्गंधी पसरली होती. अनेकदा कचरा जाळल्याने धुराचे लोट तयार होऊन प्रदूषणात वाढ झाली होती. भटक्या कुत्र्यांनी समडोळी, बेडग परिसरातील नागरिक त्रस्त झाले होते. कचरा डेपो बंद करण्यासाठी आंदोलनेही झाली. तत्कालिन आयुक्त सुनील पवार यांनी रखडलेला घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प मार्गी लावला. नव्या कचर्यावर प्रक्रिया करणे, विल्हेवाट लावण्यासाठी 43 कोटी तर जुन्या कचर्यावर प्रक्रिया करण्यासाठी 36 कोटींची निविदा मंजूर होऊन ठेकेदाराला वर्कऑर्डर देण्यात होती.
गेल्या वर्षभरात या दोन्ही डेपोचा कायापालट झाला आहे.
या दोन्ही डेपोवर सध्या कचराच शिल्लक राहिला नाही. सध्या शहरातून दररोज 210 टन कचरा गोळा केला जातो. या कचर्यावर तातडीने प्रक्रिया केली जाते. या कचर्यापासून खतनिर्मिती केली जात आहे. परिसरातील शेतकर्यांना माफत दरात खत दिले जात आहे.
शिवाय कचर्यातील राडारोडा जमिनीचा भराव करण्यासाठी केला जात आहे.
प्लास्टिक, रबर, ग्लास, इत्यादी घेऊन बाहेर कंपनीला दिले जात आहे. त्यामुळे दोन्ही कचरा डेपोवर सध्या झिरो कचरा शिल्लक राहिल्यामुळे कचर्याची दुर्गंधी गेली आहे. शेजारी असलेल्या जमिनीचे भाव आता वाढत आहेत. दोन्ही कचरा डेपोच्या शेजारी मोठ्या प्रमाणात प्लॉटिंग होऊ लागले आहे.

Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.