sangli news : पुसेसावळी – वाळवा राज्यमार्ग कामात गैरप्रकार ; प्रशासन, ठेकेदारा विरोधात याचिका : कडेगांव तालुक्यामध्ये पुसेसावळी – वाळवा राज्य महामार्गाचे काम सुरू आहे. मार्गाच्या कामातील त्रुटी व गैरप्रकाराबद्दल तालुका प्रशासनाकडे वेळोवेळी तक्रारी करुन दाद मागितली परंतु ठेकेदार व प्रशासनाची मिलीभगत असल्याने प्रशासन ठेकेदाराच्या गैरप्रकाराकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप अंबक (ता. कडेगांव) येथील राहुल पाटील यांनी करत ठेकेदार व प्रशासन यांच्या विरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली असल्याची माहिती दिली.
sangli news : पुसेसावळी – वाळवा राज्यमार्ग कामात गैरप्रकार ; प्रशासन, ठेकेदारा विरोधात याचिका
कडेगांव तालुक्यातील वांगी, अबंक, देवराष्ट्रे यामार्गे पुसेसावळी – वाळवा राज्यमार्ग क्र. 158 चे काम सुरू आहे. या मार्गाच्या ठेकेदाराने शासनाचे अनेक नियम पायदळी तुडवत बेकायदा कृत्ये केली आहेत. ठेकेदाराचे तडसर (ता. कडेगांव) येथे बेकायदा क्रशर सुरू आहे. क्रशर करीता शासनाच्या आवश्यक असणार्या बिगर शेती व अन्य परवानग्या नाहीत, क्रशर उत्खनासाठी शासनाने दिलेल्या परवानगीपेक्षा कित्येक फुट खोल उत्खनन केले आहे तसेच ठेकेदाराने विनापरवाना डीझेल पंप उभारला होता.
ठेकेदाराने राज्य मार्गाचे काम सुरू केल्यापासून मार्गाचे जूने निघालेले सरकारी मालकीचे डांबर, खडी, माती बेकायदा विकले आहे
कडेगांव महसूलकडून राज्य मार्ग ठेकेदारास मुरूम उत्खनन व वाहतूककीरता जास्त वाहने व मोठ्या कालावधीचा परवाना देऊन विशेष वागणूक दिली जात आहे. ठेकेदाराने राज्य मार्गाचे काम सुरू केल्यापासून मार्गाचे जूने निघालेले सरकारी मालकीचे डांबर, खडी, माती बेकायदा विकले आहे याबाबत सार्वजनिक बांधकाम कडेगाव यांना कळवले परंतु त्यांच्याकडून कोणतीही कारवाई करण्यात आली नाही याउलट ठेकेदाराला पाठीशी घालण्याचे धोरण अवलंबले.
राज्यमार्गाच्या संबंधित शासनाच्या सर्व विभागाशी मार्गाच्या कामात होत असलेल्या गैरप्रकार बद्दल वेळोवेळी माहिती दिली परंतु त्यांच्याकडून योग्य कारवाई झाली नाही म्हणून माहिती अधिकारात माहिती मागवली त्याचेही उत्तर समाधानकारक आले नाही. प्रशासनातील संबंधित अधिकार्यांमुळे पर्यावरणाचा र्हास होऊन धोका निर्माण झाला आहे यामुळे प्रशासन व ठेकेदार यांच्या विरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली असल्याची माहिती राहुल पाटील यांनी पत्रकार परिषद घेत दिली.
Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.