sangli mcrime news : कसबेडिग्रज येथील हॉटेल फोडणारी आंतरराज्य टोळी जेरबंद : टोळीतील तिघांना केली अटक : सांगली : मिरज तालुक्यातील कसबे डिग्रज येथील दोन फोडून लाखो रुपयांच्या साहित्याची चोरी करणार्या आंतरराज्य टोळीचा स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने पर्दाफाश केला. या टोळीकडून मालवाहतूक टेम्पो व हॉटेलमधून चोरलेले साहित्य असा 3 लाख 6 हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी संशयित समशुद्दीन महंमद इलियास खान (वय 27, रा. मोमीननगर, पेठवडगाव), महंमद इम्रान अकबर अली (वय 24, रा. पेठवडगाव, मूळ रा. मैना, जि. सिद्धार्थनगर, उत्तरप्रदेश), फर्याद आलम महंमद इलियास खान (वय 23, रा. पिपरा पठाण, जि. सिद्धार्थनगर, उत्तरप्रदेश) या तिघांना अटक केली आहे.
sangli mcrime news : कसबेडिग्रज येथील हॉटेल फोडणारी आंतरराज्य टोळी जेरबंद : टोळीतील तिघांना केली अटक
याबाबत अधिक माहिती अशी, कसबे डिग्रज येथे सहा दिवसापूर्वी हॉटेल वैभव फोडून आतील साहित्य लंपास केल्याचा प्रकार घडला होता. तसेच दहा दिवसापूर्वी हॉटेल शिलेदार येथूनही साहित्य लंपास केले होते. मालमत्तेविरूद्धचे गुन्हे उघडकीस आणण्याचे आदेश पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांनी गुन्हे अन्वेषणच्या पथकास दिले होते. गुन्हे अन्वेषणचे निरीक्षक सतीश शिंदे यांनी सहायक निरीक्षक पंकज पवार यांच्या पथकास सूचना दिल्या होत्या.
पथकातील कर्मचारी दरीबा बंडगर, अनिल कोळेकर, विक्रम खोत यांना कुपवाड एमआयडीसीमध्ये काळ्या रंगाचा मुंबई पासिंग टेम्पो संशयास्पदरित्या फिरत असल्याची माहिती मिळाली. पथकाने सावळी येथे आरटीओ ऑफीसजवळ हा टेम्पो अडवला. टेम्पोच्या हौद्यात मोठ्या गोण्या बांधलेल्या आणि पत्र्याचे तुकडे दिसले. चालक समशुद्दीन खान याची झडती घेतल्यानंतर खिशात रोकड मिळाली. केबिनमध्ये बाजूला बसलेल्या फर्याद खान याच्यासमोरील सॅक उघडून पाहली. आतमध्ये कटावणी, पक्कड, मारतूल, हॅक्सा ब्लेड मिळाले. हौद्यात भांडी, इलेक्ट्रिक फ्रीज, एसी, मोठी पातेली, ग्राईंडर, हॉटकेस मिळाली नाही.
पोलिसांनी तिघांची चौकशी केल्यानंतर कसबे डिग्रज येथील हॉटेल वैभव, हॉटेल शिलेदारमध्ये चोरी केल्याची कबुली दिली.
टेम्पो व साहित्य असा 3 लाख 6 हजार रूपयाचा मुद्देमाल जप्त केला. तिघांना मुद्देमालासह सांगली ग्रामीण पोलिसांच्या ताब्यात दिले. सदरची कारवाई पोलीस निरीक्षक सतीश शिंदे, महादेव नागणे, सागर लवटे, नागेश खरात, अमर नरळे, सागर टिंगरे, संदीप गुरव, सतीश माने, संदीप नलवडे, सूरज थोरात, सांगली ग्रामीणचे मेघराज रूपनर, अभिजीत पाटील, बंडू पवार, सायबर ठाण्याचे कॅप्टन गुंडवाडे, विजय पाटणकर यांच्या पथकाने केली.

Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.