rajkiyalive

jain samaj news : नांदणीत भगवंतांचा राज्याभिषेक उत्साहात

jain samaj news : नांदणीत भगवंतांचा राज्याभिषेक उत्साहात” नांदणी (ता. शिरोळ) येथे पंचकल्याण महामहोत्सवाच्या चौथ्या दिवशी भगवंतांचा राज्याभिषेक सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. या राज्याभिषेकांमध्ये छप्पन देशांच्या राजांचे आगमन त्यांच्याकडून राज्याभिषेकावेळी नजराणा अर्पण, राजतिलक, राज्यसभा, शास्त्र सभा हे धार्मिक कार्यक्रम पाहण्यासाठी भाविकांची अलोट गर्दी होती.

jain samaj news : नांदणीत भगवंतांचा राज्याभिषेक उत्साहात

आजच्या कार्यक्रमाला मिरवणुकने प्रारंभ होऊन जलकुंभ आणण्याचा कार्यक्रम पार पडला. त्यानंतर त्यागींचे प्रवचन झाले. भगवंतांच्या राज्याभिषेक सोहळ्याच्या वेळी आचार्य विशुद्धसागर महाराज यांचे प्रवचन झाले. यावेळी आचार्य म्हणाले, भगवान आदिनाथ तीर्थंकरांनी त्या काळात पुरुष व स्त्रियांना समान अधिकार दिले. आपल्या मुला मुलींना शिक्षण देण्याची जबाबदारी आई-वडिलांची आहे. तसेच त्यांना संस्कारित करण्याची जबाबदारी आहे. समाजाचे रक्षण होणार नसेल तर धर्माची रक्षण ही होणार नाही.

देशासाठी बुद्धी आणि विद्या दोन्ही आवश्यक असते. बुद्धी उपजत असते. विद्या शिकवली जाते.

जगातील सर्वाधिक बुद्धिमानाला विधान भर म्हणतात भगवान आदिनाथ तीर्थंकर हे महाविदामबर होते. जैन भिक मागत नाही. जैन समाजाने देशाला दिले आहे. तो देशाकडून घेत नाही हा इतिहास आहे. माझ्या सत्तेचाळीस वर्षाच्या दीक्षा काळात सर्व जातीपातीचे लोक एकत्र येऊन कार्यक्रम करतात हे पहिल्यांदा घडते.

आज मठाधिपती स्वस्तिश्री जिनसेन महास्वामी यांच्या उपस्थित व शिरोळचे आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्याहस्ते मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. आजच्या कार्यक्रमासाठी आम. विनय कोरे, आम. अशोकराव माने, माजी आम. वीरकुमार पाटील, उद्योगपती संजय घोडावत, मयूर संघाचे डॉ. संजय पाटील, कर्नाटकचे आम. सिध्दू सौदी, संजय पाटील- यड्रावकर, अरिहंत ग्रुपचे उद्योजक उत्तम पाटील यांचे परिवार, अल्पसंख्यांक सेलचे अध्यक्ष ललित गांधी, यवतमाळचे उपजिल्हाधिकारी सुधीर पाटील आदी उपस्थित होते.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज