rajkiyalive

jain samaj news : नांदणींत पंचकल्याण प्रतिष्ठा महामस्तकाभिषेक महोत्सवात आज 550 लहान मुलांवर मौजीबंधन विधी

jain samaj news : नांदणींत पंचकल्याण प्रतिष्ठा महामस्तकाभिषेक महोत्सवात आज 550 लहान मुलांवर मौजीबंधन विधी नांदणी (ता. शिरोळ) येथे सुरू असलेल्या पंचकल्याण प्रतिष्ठा महामस्तकाभिषेक महोत्सवात आज 550 लहान मुलांवर मौजीबंधन विधी करण्यात आले. आचार्य विशुद्धसागर महाराज स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी आणि मुनी महाराज यांनी संस्कार केले.

jain samaj news : नांदणींत पंचकल्याण प्रतिष्ठा महामस्तकाभिषेक महोत्सवात आज 550 लहान मुलांवर मौजीबंधन विधी

सकाळी नित्य विधी, मंगल कलश मिरवणूक, अभिषेक पूजा संपन्न झाली. दुपारी राज्याभिषेकचा उत्तरार्ध, राजदरबारात निलांजना नृत्य, लोकांतिक देवागमन, आदिनाथ स्वामींना वैराग्य भावना, सर्व राजवैभव सोडून आदिनाथ स्वामींनी दिक्षा घेतली. हा एक भावनिक कार्यक्रम असतो.

यावेळी प्रवचनात बोलताना आचार्य विशुद्धसागर म्हणाले, बाल जीवन हे कोमल जीवन आहे. गुरुची निंदा करायची नाही तसेच गुरुची निंदा सुद्धा सहन करायची नाही. बालपणातच संयम आणि शिलाचे पालन करायला शिकणे गरजेचे आहे. मद्याचे सेवन कधीच करू नये. पिता बनण्याची योग्यता 21 व्या वर्षी होते. माता बनण्याची योग्यता अठराव्या वर्षी होते. तर परमात्मा बनण्याची योग्यता आठव्या वर्षीच होते.

दुःखी प्राणी दुःख से शांती सहन करू शकतो. पण जे सुखी आहेत ते दुःखी असणार्‍यांना शांतीने जगू देत नाहीत.

जग आपल्यात सुखी नाहीत पण परक्यांच्या सुखात दुःखी आहेत. जे साधू पुरुष असतात ते जगाचे दुःख बघून दुःखी होतात. मुलांनी मातापित्यांचा सन्मान राखला पाहिजे असेही ते म्हणाले.
आज रविवार दिवस असलेने प्रचंड गर्दी होती. दीड लाखाहून अधिक श्रावकांची उपस्थिती. आज अनेक मान्यवर पंचकल्याण महोत्सवात हजेरी लावली.

उद्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पंचकल्याण पूजेमध्ये सदिच्छा भेट देणार आहेत. दुपारी ठीक एक वाजता मुख्यमंत्र्यांचे नांदणी धर्म नगरीत आगमन होणार आहे. पंचकल्याण समितीने त्यांच्या स्वागताची जय्यत तयारी केली आहे. परिसरातील सर्व जनतेला कार्यक्रमास उपस्थित राहणे बाबत पूजा समितीने आवाहन केले आहे.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज