sangli news : आविष्कार कल्चरल गु्रपच्या सभासद नोंदणीस प्रारंभ : आविष्कार कल्चरल ग्रुपची राज्याच्या सांस्कृतिक क्षेत्रातील सलग 22 वर्षाची दैदीप्यमान वाटचाल आपणा सर्वांना अभिमानस्पद असल्याचे गौरवोद्गार जेष्ठ उद्योजक नितीन झंवर (आष्टा) यांनी काढले. ’आविष्कार’ही आपल्या तालुक्याची सांस्कृतिक ओळख असून ती जपण्यासाठी सर्वांनी हातभार लावायला हवा,अशी भावना ही त्यांनी व्यक्त केली.
sangli news : आविष्कार कल्चरल गु्रपच्या सभासद नोंदणीस प्रारंभ
राजारामनगर येथे आविष्कार कल्चरल ग्रुपच्या 23 व्या संगीत महोत्सवाचा सभासद नोंदणी शुभारंभ श्री.झंवर यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी ते बोलत होते. राजारामबापू साखर कारखान्याचे संचालक शैलेश पाटील,उद्योजक योगेश पाटील (रेठरे धरण),आविष्कारचे अध्यक्ष प्रा.कृष्णा मंडले, कार्याध्यक्ष भूषण शहा,सचिव विजय लाड प्रामुख्याने उपस्थित होते. प्रारंभी लोकनेते राजारामबापू पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन करण्यात आले.

नितीन झंवर पुढे म्हणाले,माजी मंत्री आ.जयंतराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली 2002 साली आविष्कारचा सुरू झालेला प्रवास आजही अखंडपणे सुरू आहे. आविष्कार ही एक संस्था राहिली नसून ती एक सांस्कृतिक चळवळ बनली आहे.
संचालक शैलेश पाटील म्हणाले, आविष्कारने राज्याच्या सांस्कृतिक क्षेत्रात एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.
याप्रसंगी आझाद विद्यालयाचे मुख्याध्यापक संजय पवार,अँड.धनंजय देवकर,रियाज मुल्ला,राजकुमार मदने, अलकेश दवणे,संतोष डांगे,राजेंद्र मोदुगडे यांच्यासह असंख्य कलारसिकांनी सभासदत्व स्विकारले.
आविष्कारचे माजी अध्यक्ष सतिश पाटील,सुनिल चव्हाण,माजी कार्याध्यक्ष प्रा.प्रदीप पाटील,मजूर फेडरेशनचे संचालक संतोष पाटील,ताकारीचे माजी सरपंच अर्जुन पाटील,सहसचिव विजय नायकल,खजिनदार विश्वास कदम,संजय पाटील,विनायक यादव, बालाजी पाटील,आप्पासो जावीर,अजय थोरात,हर्षवर्धन घोरपडे,श्रेयस पाटील,अक्षय पाटील,प्रताप कवठेकर यांच्यासह आविष्कार चे सदस्य व सभासद उपस्थित होते.

ताज्या घडामोडी पाहण्यासाठी राजकीय लाईव्ह या व्हॉटसअॅप चॅनलला फॉलो करा, येथे क्लिक करा
प्रारंभी अविष्कारचे अध्यक्ष प्रा.कृष्णा मंडले यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. कार्याध्यक्ष भूषण शहा यांनी आभार मानले. माजी सचिव विश्वनाथ पाटसुते यांनी सूत्रसंचालन केले.
फोटो ओळी- राजारामनगर येथे आविष्कार कल्चरल ग्रुपच्या सभासद नोंदणीचा शुभारंभ करताना उद्योजक नितीन झंवर. समवेत संचालक शैलेश पाटील,उद्योजक योगेश पाटील,प्रा.कृष्णा मंडले,भूषण शहा,विजय लाड,संतोष पाटील,प्रा.प्रदीप पाटील,सुनिल चव्हाण व मान्यवर

Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.



