जत तालुक्यातील शाळेतील प्रकार, सीईओंकडून चौकशीचे आदेश
sangli crime news : जत तालुक्यात शिक्षकाकडून विद्यार्थीनीशी अश्लील चाळे : जिल्हा परिषद शाळेत पाचवीच्या वर्गात शिकणार्या विद्यार्थीनीशी शिक्षकानेच अश्लील वर्तन केल्याची घटना घडली. याबाबत संबधित मुलीच्या पालकांनी शाळेकडे तक्रारी केली असून महिन्यानंतरही कारवाई झालेली नाही. याबाबत उलट-सुलट चर्चा सुरु आहे, हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप होत आहे.
sangli crime news : जत तालुक्यात शिक्षकाकडून विद्यार्थीनीशी अश्लील चाळे
जत तालुक्यात पूर्व भागात असणार्या एका गावातील शाळेत ही घटना घडली आहे. कन्नड माध्यम शाळेतील कन्नड माध्यमच्या शिक्षकांकडूनच हा प्रकार झाल्याचे सांगण्यात येत आहे. जिल्हा परिषदेच्या शाळेत पाचवीत शिकणार्या मुलीसोबत ही घटना घडली आहे. हे कृत्य करणार्या शिक्षकाचे वय 50 हून अधिक आहे. ही घटना घडून महिना होऊन गेला. पालकांनी याबाबत केलेल्या तक्रार केली, मात्र कारवाई झालेली नाही. त्यामुळे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न असल्याने संताप व्यक्त होत आहे.

संबधित पालकांनी शाळेत तक्रार केल्यानंतर स्थानिक पातळीवरही हे प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. स्थानिक पातळीवर तसेच तालुका पातळीवरही न्याय मिळत नसल्याने याबाबतची तक्रार जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्यापर्यंत पोहोचली आहे. आलेल्या तक्रारीनुसार सीईओ धोडमिसे यांनी गटशिक्षणाधिकार्यांना तातडीने चौकशीचे आदेश दिले आहेत. मात्र अद्याप चौकशी अहवाल जिल्हा परिषदेला पोहोचलेला नाही. संबधित विद्यार्थीनीच्या पालकांवर त्यांची तक्रार नसल्याबाबतचे म्हणणे घेण्यासाठी दबाव आणला जात असल्याची चर्चा आहे.
चौकशी अहवालानंतर कारवाई ः तृप्ती धोडमिसे
जत तालुक्यातील कन्नड माध्यमाच्या शाळेत घडलेल्या घटनेबाबतची गंभीर दखल घेवून तत्काळ चौकशीचे आदेश दिले आहेत. त्याबाबतचा अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई केली जाईल, असे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी सांगितले.

Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.



