आमदार डॉ. विश्वजीत कदम यांची घोषणा
jain samaj news : भारती विद्यापीठ आचार्यश्री विशुद्धसागर महाराजांना डी.लिट पदवी देणार : चर्याशिरोमणी, अध्यात्मयोगी प.पू.108 आचार्यश्री विशुद्धसागर महाराजांचे साहित्यामध्ये मोठे योगदान आहे. 550 हून अधिक मुनींचे नेतृत्व करणारे आचार्यश्रींच्या कठोर मुनिचर्या आणि साहित्य पाहता त्यांना भारती विद्यापीठातर्फे डी.लिट पदवी प्रदान करीत असल्याचे भारती विद्यापीठाचे प्र.कुलगुरु व आमदार विश्वजित पतंगराव कदम यांनी उपस्थित लाखो श्रावक श्राविकांच्या उपस्थितीत जाहीर केले.
jain samaj news : भारती विद्यापीठ आचार्यश्री विशुद्धसागर महाराजांना डी.लिट पदवी देणार
नांदणी येथे पूज्य आचार्यश्रींच्या पंचकल्याण प्रतिष्ठा व महामस्तकाभिषेक महासोहळ्यास आ. डॉ. कदम प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहून पूज्य आचार्यश्रींचा तसेच पूज्य भट्टारकांचा आशिर्वाद घेतला.

डॉ. कदम म्हणाले, ज्यांनी सत्यार्थ बोध, कर्म विपाक यासह 250 हून अधिक महान ग्रंथांची रचना केली. त्यांच्या ‘वस्तुत्व महाकाव्य’ या महाव्याचा गोल्डन बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नोंद झाली आहे. यापूर्वी भारती विद्यापीठातर्फे सन 2019 मध्ये संतशिरोमणी आचार्यश्री विद्यासागर महाराज यांना ‘डी.लिट्’ पदवी बहाल करण्यात आली होती. चर्या आणि विद्वत्तेने परिपूर्ण अशा आचार्यश्रींच्या कार्यामुळे ही उपाधी देताना भारती विद्यापीठ स्वत:ला गौरवान्वित समजते.
तत्पूर्वी नांदणी मठाचे प.पू.स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामीजी यांनी डॉ. कदम यांचा मंगल कलश, शाल श्रीफळ देवून सन्मान करून आपल्या आशीर्वचनामध्ये पूज्य आचार्यश्रींना ‘डी.लिट्’ पदवी मिळावी अशी इच्छा व्यक्त केली. त्यासंबंधीची सर्व कागदपत्राविषयींचा पाठपुरावा दक्षिण भारत जैन सभेचे चेअरमन व पंचकल्याण प्रतिष्ठा पूजा महोत्सव व महामस्तकाभिषकाचे उपाध्यक्ष रावसाहेब पाटील करीत असल्याचे नमूद केले होते.

यावेळी चारूकीर्ति भट्टारक महास्वामीजी श्रवणबेळगोळ, देवेंद्रकीर्ति भट्टारक महास्वामी ज्वालामालिनी, कर्नाटकाचे माजी मंत्री श्रीमंत पाटील, माजी खा.राजू शेट्टी, आ. राजेंद्र पाटील-यड्रावकर, उत्तम पाटील, अभिनंदन पाटील, सावकार मादनाईक, राजू पाटील, राजू झेले, आप्पा भगाटे, सागर शंभूशेटे यांच्यासह श्रावक-श्राविका उपस्थित होते

Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.



