नांदणीत आठ दिवसात 11 लाख श्रावकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ
50 आचार्यांची अविरत सेवा: नांदणी (ता. शिरोळ) येथे गेल्या आठ दिवसापासून सुरु असलेल्या पंचकल्याणक प्रतिष्ठा व महामस्तकाभिषेक सोहळ्यात सुमारे दहा ते अकरा लाख श्रावकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला आहे. या महाप्रसादासाठी नांदणीतील सुमारे 50 आचारी अविरत सेवा बजावत आहेत.
नांदणीत आठ दिवसात 11 लाख श्रावकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ, 50 आचार्यांची अविरत सेवा
धान्य पुरवठ्यासाठी दहाजण व जेवण पोहोच करण्यासाठी 40 जण कार्यरत आहेत. वीर सेवा दलाचे दररोज तीनशे ते चारशे कार्यकर्ते जेवण वाढण्यासाठी सकाळी दहापासून सायंकाळी सहापर्यंत कार्य करीत आहेत. जेवणासाठी दररोज सात टन धान्य पुरविण्यात येते. तर वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ याठिकाणी श्रावकांना महाप्रसाद म्हणून उपलब्ध करुन देण्यात येत आहे.

1 जानेवारीपासून नांदणी (ता. शिरोळ) येथे पंचकल्याणक प्रतिष्ठा व महामस्तकाभिषेक महोत्सव सुरु आहे. दररोज सुमारे एक लाखाहून अधिक श्रावक पुजा ठिकाणाला भेट देतात. या श्रावकांना पुजा समितीकडून महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. सुमारे चार एकर क्षेत्रात भोजन मंडप उभारण्यात आले आहे. तर एक एकर क्षेत्रात भोजन तयार करण्याचे स्वयंपाकगृहाची सोय केली आहे.
नांदणी येथील सुमारे 50 आचारी 1 जानेवारीपासून दिवसरात्र भोजन व्यवस्था यशस्वी करण्यासाठी झटत आहेत. दररोज येणार्या लाखो श्रावकांची भोजनाची उत्कृष्ट सोय व्हावी म्हणून वीर सेवा दलाचे तीनशे ते साडेतीनशे स्वयंसेवक सेवा देत आहेत. दररोज वेगवेगळ्या गावातील वीर सेवा दल सदस्य याठिकाणी येवून सकाळी आठ ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत जेवण वाढण्याचे काम करत आहेत. तर कर्नाटक येथील शंभर स्वयंसेवक निवासी असून ते त्यागी विभाग व स्टेज विभाग सांभाळत आहेत.

वीर सेवा दलाकडून या सर्व गोष्टींचे संयोजन मुख्य संयोजक श्रीधर शेट्टी, सहसंयोजक राकेश चौगुले, अमोल चौगुले, अनिल पाटील, प्रकाश दानोळे, प्रदिप मगदूम, माणिक रोटी, प्रविण धोतरे, जयपाल नडवीनमणी, संजय अथणे, ऋषिकेश खोलकुंभे, संतोष ककडे, विजय खोलकुंभे करीत आहेत.

Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.



