rajkiyalive

sangli crime news : येडेनिपाणी फाट्याजवळ कारच्या धडकेत रिक्षा 30 फूट खाली कोसळला ः मायलेकींचा मृत्यू

sangli crime news : येडेनिपाणी फाट्याजवळ कारच्या धडकेत रिक्षा 30 फूट खाली कोसळला ः मायलेकींचा मृत्यू: पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर वाळवा तालुक्यातील येडेनिपाणी फाट्यानजीक चारचाकी कारने अपेरिक्षाला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने मुख्य रस्त्यावरून 20 फूट सेवा रस्त्यावर कोसळली. या अपघातात रिक्षात बसलेल्या आई व मुलीचा मृत्यू झाला. शारदा लक्ष्मण सुपने (वय 55, रा.इस्लामपूर, ता.वाळवा) व अक्काताई भुजंगा एडके (वय 70, रा.नागाव, ता.वाळवा) अशी मायलेकींची नावे आहेत. शनिवारी सकाळी 6 च्या सुमारास हा भीषण अपघात घडला.

sangli crime news : येडेनिपाणी फाट्याजवळ कारच्या धडकेत रिक्षा 30 फूट खाली कोसळला ः मायलेकींचा मृत्यू

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, नागाव ता.वाळवा येतील अक्काताई भुजंगा एडके व इस्लामपूर-धनगर गल्ली येथील शारदा लक्ष्मण सुपणे या मायलेकी शनिवार दि.11 जानेवारी रोजी अपेरिक्षा क्र.(एमएच 10 जी 2327) मधून कोल्हापूरच्या दिशेने निघाल्या होत्या. राष्ट्रीय महामार्गावर येडेनिपाणी हद्दीतील अरुण पाटील धाब्यासमोरील रोडवर सकाळी 6 च्या सुमारास आले. दरम्यान हुंडाई कार क्र. (एम.एच.09 जीएफ 4704) या चारचाकी कारने अपेरिक्षाला भरधाव वेगाने पाठीमागून जोराची धडक दिली.

या धडकेत रिक्षा मुख्य रस्त्यावरुन सेवारस्त्यावर कोसळली. रिक्षाचा अक्षरशा चक्काचूर झाला. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या अक्काताई भुजंगा एडके व शारदा लक्ष्मण सुपणे यांचा जागीच मृत्यू झाला. आक्काताई एडके यांना अर्धांग वायू झाल्याने मागील चार महिन्यापासून कोल्हापूर जिल्ह्यातील पोरले येथे औषध उपचार सुरू होता. या औषधाने अक्काताई यांना फरक पडल्याने पाच महिन्याचा औषध कोर्स सुरू होता. आज शेवटचा डोस असल्याने सकाळी इस्लामपूरहून अ‍ॅपे रिक्षा घेऊन मायलेकी निघाल्या होत्या.

वाटेतच त्यांच्यावर काळाने घाला घातला. या घटनेची माहिती मिळताच कुरळप पोलीस स्टेशनचे स.पो.नि.विक्रम पाटील, पो.कॉ.तानाजी बाबरसह टीम घटनास्थळी दाखल झाली. घटनेचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी सरकारी रुग्णालयात पाठवण्यात आला. घटनास्थळी कारची एम.एच.09 जीएफ 4704 ही नंबरप्लेट आढळून आली. त्या नंबरप्लेटवरून चालक रामदास नामदेव सुतार (रा. मोरेवाडी, ता.भुदरगड) याला कुरळप पोलिसांनी ताब्यात घेत अपघाताचा गुन्हा नोंद केला आहे. अधिक तपास कुरळप पोलीस करत आहेत.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज