miraj crime news : आरग लक्ष्मी मंदिरातील दागिने लंपास, मिरज ग्रामीण भागात चोरीचा सपाटा : मिरज तालुक्यातीला आरग जवळ असलेल्या लक्ष्मीवाडी येथील ग्रामदैवत श्री महालक्ष्मी मंदिरात अज्ञात चोरट्यांनी चोरी करून मंदिरातील अंदाजे सोन्या-चांदीचे दागिने रोख रक्कम असा अंदाजे 80 हजारांचा मुद्देमाल लंपास केला. चोारट्यांनी मंदिरात असलेल्या सीसीटीव्हीचे डीव्हीआर तोडून घेवून गेले आहेत. मिरज ग्रामीण पोलिसात या चोरीची नोंद झाली असून, पोलिस अधिक तपास करीत आहेत.
miraj crime news : आरग लक्ष्मी मंदिरातील दागिने लंपास, मिरज ग्रामीण भागात चोरीचा सपाटा
आरग येथील पद्मावती मंदिरात चोरी घटना ताजी असतानाच पाठोपाठ लक्ष्मीवाडी येथील लक्ष्मीमंदिरात चोरी झाल्याने मिरज पर्व भागात भितीचे वातावरण पसरले आहे. आरग पासून काही अंतरावर बेडग मंगसुळी रस्त्यावरील श्री महा लक्ष्मी मंदिर आहे. श्री लक्ष्मीवाडी गावची ग्रामदैवत असलेल्या मंदिराच्या समोरील दरवाजाचे कुलूप कटरने तोडून मंदिरात प्रवेश करून श्री लक्ष्मीदेवीच्या अंगावर असलेले सोन्याचे मंगळसूत्र, चांदीचे दागिने, देवीचा मुखवटा, चांदीच्या पादुका व काही वस्तू चोरट्यांनी लंपास केले आहे.
तसेच मंदिरातील दानपेटी तोडून घेवून ती दानपेटी मंदिराच्या मागील बाजूस असलेल्या सटवाई देवीच्या बाजूने ऊसाच्या शेतात जाऊन दानपेटी फोडून त्यातील काही रक्कम घेवून दानपेटी ओढा पात्रात फेकून दिले आहे. चोरट्यांनी जेवणावर ताव मारून पत्रावळे तेथे फेकल्याचे दिसते. चोरीची घटना पहाटे दीड वाजण्याच्या सुमारास घडल्याचा अंदाज आहे. चोरांनी सोन्याचे दांगिने, दान पेटीतील पैसे असा एकूण 80 हजार रूपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
सकाळी पुजारी मंदिरात पुजा करण्यासाठी आले असता त्यांना मंदिराचा दरवाजा तुटल्याचे लक्षात आले.
त्यांना संशय आल्याने त्यांनी मंदिरातील मूर्तीची पाहणी केली असता मुखवटा, चांदीच्या पादुका, सोन्या-चांदीचे दागिने, दान पेटी चोरल्याचे लक्षात आले. पुजार्यांनी याची माहिती पोलिसांना दिली.
घटनास्थळी उपविभागीय पोलिस अधिकारी प्रणिल गिल्डा, मिरज ग्रामीण पोलिस निरीक्षक अजित सिद दाखल झाले. श्वान पथक, ठसे तज्ज्ञांना प्रचारण करण्यात आले.श्वानाने मंदिरापासून काही अंतरावर असलेल्या ऊसाच्या शेतापर्यंत मार्ग दाखविला. पोलिस गावातील कुठे कुठे सीसीटीव्ही आहेत त्याची पाहणी करीत आहेत. एकापाठोपाठ दुसरी चोरी झाल्याने पोलिसांनीही तपास गतीमान केला असून लवकर आरोपी ताब्यात येतीला असे सांगितले आहे.

Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.