sangli crime news : निमणीत अज्ञाताने द्राक्षघड तोडून केले चार लाखाचे नुकसान : तासगाव तालुक्यातील निमणी येथील एका द्राक्षबागेतील द्राक्षे रात्रीत काठीने, खुरप्याने पाडून जमिनदोस्त केली आहे. यामध्ये संबधित द्राक्षबागायदारांचे सुमारे 4 लाखांचे नुकसान झाले आहे. याप्रकरणी तासगाव पोलीसात अज्ञात व्यक्ती विरुध्द तक्रार देण्यात आली आहे.
sangli crime news : निमणीत अज्ञाताने द्राक्षघड तोडून केले चार लाखाचे नुकसान
समाजात काही लोकांच्यात जागेवरून असो अथवा अन्य कारणावरून असो एकमेकाबाबत राग असतो. हा राग व्यक्त करताना भांडणे होणे, रागातुन समोरा समोर येऊन प्रसंगी मारामारी, मारहाण होणे असे प्रकार पाहवयास मिळतात. पण आपला असाच राग जर कोणी व्यक्ती शेतातील हाता तोंडाला आलेल्या पिकावर काढत असेल तर त्या व्यक्तीस निहदयी व्यक्तीच म्हणावे लागेल.
अगदी असेच चित्र तासगाव तालुक्यातील निमणी येथे पाहवयास मिळाले. नेहरूनगर येथील माणिक दादू देशमुख रा. नेहरूनगर ता. तासगांव यांची निमणी गावचे हद्दीत गट नं.235 मध्ये 30 गुंठे द्राक्ष बाग पाच ते सहा वर्षा पूर्वी लावली आहे.या बागेत सुपर जातीची सुमारे 700 झाडे आहेत. ही द्राक्षे काही दिवसातच बाजार पेठेत विक्रीसाठी जाणार होती.
सोमवारी सायंकाळी 7 वाजे पर्यंत द्राक्षबागेतील द्राक्षे व्यवस्थित होती.
सोमवारी सकाळी 8 च्या दरम्यान शेजारील व्यक्तीने देशमुख यांना द्राक्षबागेतील द्राक्षे तोडण्यात आली असल्याचे फोन करून सांगितले. फिर्यादी यांनी तातडीने द्राक्षबागेत धाव घेतली. त्यावेळी त्या अज्ञात व्यक्तीने काही झाडावरील द्राक्षे काठीने तर काही झाडावरील द्राक्षे खुर्याने पाडून जमिनदोस्त केल्याचे दिसून आले.
याप्रकरणी देशमुख यांनी अज्ञात व्यक्ती विरूध्द तासगांव पोलीसात तक्रार दिली आहे. तर पोलीसांच्यासह कृषी विभागाच्या लोकांनी द्राक्षबागेची पाहणी केली आहे. बुधवारी तलाठी यांचे कडून अधिकृत पंचनामा होणार असल्याचे देशमुख यांनी सांगितले. हाता तोंडाला आलेली द्राक्षे निहदयी पणे जमिनदोस्त केल्याने परिसरातून हळहळ तर व्यक्त होत आहेच पण त्या निहृदयी अज्ञात व्यक्ती बाबत संताप ही व्यक्त होत आहे.

Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.