बँक कर्मचार्यांवर राहणार वॉच, व्हिसल ब्लोअर धोरण लागू
sangli bank news : जिल्हा बँकेतील गैरप्रकार कळवा अन् 10 हजार बक्षीस मिळवा : जिल्हा बॅँकेच्या कारभारावर होत आरोप आणि घोटाळे वेळीच लक्षात यावे, त्यावर योग्य कारवाई होण्यासाठी बॅँकेने आता ’व्हिसल ब्लोअर’ धोरण लागू केले आहे. याअंतर्गत बॅँकेतील गैरकारभाराची माहिती कळवल्यास संबधिताला एक हजार ते जास्तीत जास्त दहा हजार रुपयांपर्यंत बक्षीस दिले जाणार आहे. माहिती देणार्यांचे नाव व ओळख पूर्णपणे गोपनिय ठेवण्यात येणार असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजीराव पाटील यांनी सांगितले.
sangli bank news : जिल्हा बँकेतील गैरप्रकार कळवा अन् 10 हजार बक्षीस मिळवा
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेत गेल्या काही वर्षात कर्मचार्यांकडून झालेल्या गैरकारभाराच्या काही घटना उघडकीस आल्या आहेत. यात या शासनाच्या अनुदानापासून ते खातेदारांच्या पैशांवर डल्ला मारल्याचे प्रकार घडले आहेत. याप्रकणी बॅँकेने तात्काळी कारवाई करीत अपहाराची रक्कम काही प्रमाणात वसूल केली आहे. तसेच गैरकारभार करणार्या कर्मचार्यांवरही कारवाई करण्यात आली होती. बॅँकेत ठेवलेल्या सोने तारणातही यापूर्वी गैरकारभार झाल्याचे उघड झाले होते.

या पार्श्वभूमीवर आता जिल्हा बॅँकेच्या कर्मचार्यांवर, त्यांच्या कामकाजावर सामान्य नागरिक, खातेदार नियंत्रण ठेवू शकणार आहेत. बँकेच्या कोणत्याही शाखेत कसल्याही प्रकारचा अपहार, धोरणबाह्य कामकाज व अन्य प्रकारचा कोणताही गैरकारभार होत असेल तर याची माहिती, तक्रार बॅँकेच्या सांगलीतील मुख्यालयात अथवा बॅँकेच्या मेलवर कळविता येणार आहे. या माहितीची खातरजमा करुन यात तथ्य आढळल्यास संबधित कर्मचार्यांकडून होत असलेल्या गैरकारभार किती रकमेचा व मोठा आहे, त्यांचे स्वरुप काय आहे. यावर माहिती देणार्यास एक हजार रुपयांपासून सर्वाधिक दहा हजार रुपयांपर्यंत बक्षिस देण्यात येणार आहे.
कारभारात पारदर्शकता आणणार
जिल्हा बँकेचे संचालक मंडळाने बँकेचे व्यवहारात पारदर्शकता आणणेसाठी व्हिसल ब्लोअर धोरण मंजूर केले आहे. सदर धोरणानुसार बँकेच्या कर्मचार्यांवर नियंत्रण ठेवण्यात येईल. राज्यातील जिल्हा बँकांमध्ये सांगली जिल्हा बँक पहिल्या पाचमध्ये समावेश आहे. बँकेच्या कामकाजात अधिक सुसूत्रता आणून गतीमान करण्यासाठी व्हीलस ब्लोअर योजना राबविण्यात येणार असल्याचे बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजीराव वाघ यांनी सांगितले.

Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.



