rajkiyalive

tasgaon crime news : आरवडेत आढळला महिला मृतदेहाचा सांगाडा

tasgaon crime news : आरवडेत आढळला महिला मृतदेहाचा सांगाडा : आरवडे ता. तासगांव येथे कोल्हापूरकर मळ्यात चार महिन्यापूर्वी हरवलेली महिला शांताबाई धर्मा ( वय 65) वाघ हिचा मृतदेहाचा सापळा आज घराजवळ असणार्‍या बंधार्‍यात सापडला. ही ओळख मुलगा अजय वाघ यांनी पटवली. सापळ्यावर असणार्‍या साडी स्वेटर व टॉवेल वरून ही ओळख पटवली गेली. मृतदेह चार महिने पाण्यात असल्याने फक्त याची हाडेच शिल्लक राहिली होती. पोलीस व कुटुंबीय चार महिन्यांपासून शोध घेत होते. त्या एकट्याच मळ्यात गेली 25 वर्ष झाली राहत होत्या.

tasgaon crime news : आरवडेत आढळला महिला मृतदेहाचा सांगाडा

घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की आरवडे कोल्हापूरकर मळ्यात असणार्‍या बंधार्‍यात काही मुले दुपारी बाराच्या सुमारास असणार्‍या रंकाळी डोंगरात फिरत असताना एक सापळा दिसला . त्यांनी ही माहिती गावात ग्रामस्थांना दिली. या मृत सापळा नुसता हाडाचा होता. त्यावर साडी व स्वेटर असल्याने चार महिन्यापूर्वी हरवलेली आई शाताबाई धर्मा वाघ याचा असल्याचे मुलगा अजय यांनी घटनास्थळी ओळख पटवली.

मृतदेहाचा स्पॉट पंचनामा प्राथमिक आरोग्य अधिकारी मांजर्डे डॉकटर संदीप माने केला . यावेळी डॉ. पल्लवी वाघ व डॉ. रोहित जाधव हे ही घटनास्थळी उपस्थित होते . यावेळी डॉक्टर माने यांनी पाण्यात बुडून मृत्यू झाल्याचा अंदाज व्यक्त केला आहे.

तीन महिन्यांपूर्वी गावातील महिला हरवलेली होती.

याची नोद तासगांव पोलीस ठाण्यात करण्यात आली होती. घटनेची माहिती मिळताच मुलगा अजय तिथं आला असता त्यांनी सापळ्यावर असणार्‍या साडी स्वेटर व टॉवेल वरून त्यांनी आईची ओळख पटवली. यावेळी अजय यांनी भाऊ विजय हा गुजरातहून आल्यानंतर आम्ही पुढील अतविधी करू असा पवित्रा घेतल्याने घटनास्थळी वातावरण तापले होते. त्या मतिमंद असल्याच्या ही घटनास्थळी चर्चा होती.

घटनेचा तपास पोलीस निरीक्षक सोमनाथ वाघ करीत आहेत. यावेळी पोलीस निरीक्षक उपनिरीक्षक विजय गोडसे, उपसरपंच प्रकाश चव्हाण, पंढरीनाथ वाघ, आर.बी वाघ यांनी घटनास्थळी उपस्थित होते.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज