rajkiyalive

jat political news : जिल्हयात भाजप विरोधात विलासराव जगतापांची मोर्चेबांधणी

शरद पवारांची जगतापांना पक्ष प्रवेशाची ऑफर

असिफ सय्यद

jat political news : जिल्हयात भाजप विरोधात विलासराव जगतापांची मोर्चेबांधणी  : जतचे माजी आमदार विलासराव जगतापांची भाजपने गेम केल्याची चर्चा जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात रंगलेली असतानाच जगतापांनी जिल्ह्यातील भाजप विरोधात मोर्चेबांधणीस सुरुवात केली आहे. माजी खासदारांबरोबर त्यांची बैठक झाली असून खुद्द देशाचे माजी मंत्री शरद पवार यांच्या समोरच जगतापांनी माजी मंत्री, शरदचंद्र पवार राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांना जिल्ह्यातील भाजप विरोधात मोट बांधा, नेतृत्व करा असे जाहीर आवाहन केले आहे.

jat political news : जिल्हयात भाजप विरोधात विलासराव जगतापांची मोर्चेबांधणी

खुद्द शरद पवारांनी जगतापांना पक्षाचे काम करा अशी ऑफरही दिली आहे.भाजप विरोधातील जगतापांनी टाकलेले डावपेच जर यशस्वी झाले तर आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत जिल्ह्यातील भाजपची डोकेदुखी वाढणार आहे.

मागील 40 वर्षापासून जतच्या नव्हे तर संपूर्ण सांगली जिल्ह्याच्या राजकीय पटलावर किंगमेकर ते किंग असा प्रवास करणारे जतचे माजी आमदार विलासराव जगताप हे आक्रमक नेते म्हणून ओळखले जातात. ज्या पक्षात ते आहेत तेथे प्रामाणिक काम करणे, पक्षाचे पटले नाही तर जनता हाच पक्ष म्हणून सडेतोड भूमिका मांडण्याचा त्यांचा हा स्वभाव. त्यांचा हा स्वभावच भाजपमध्ये नडला.

भाजपच्या भूमकेवर जगतापांनी अनेकदा थेट तोफ डागली, पक्षाचा राजिनामा देत अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांचा जाहीर प्रचार त्यांनी केला. नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीतही गोपीचंद पडळकरांना विरोध करत भाजपवर निशाणा साधला. जगतापांनी भाजपला अगोदरच सोडचिठ्ठी दिलेली असताना भाजपने त्यांचे निलंबन केले.

जगताप विरुद्ध भाजप असा उभा संघर्ष लोकसभेपासून सुरू आहे. लोकसभेला संजयकाका पाटील तर विधानसभेला गोपीचंद पडळकर यांना जगतापांनी विरोध केला. जगतापांच्या विरोधाला भाजपने नाकारले. राजकारणातील चाणक्य असलेले जगतापांनी भाजप विरोधात खेळी खेळण्यास सुरुवात केली आहे. माजी खासदारांबरोबर त्यांची एक बैठक झाली असुन त्यानंतर संख येथे स्व. बसवराज पाटील यांच्या पुतळा अनावरणप्रसंगी जगतापांनी आपली रोखठोक भूमिका मांडली.

खुद्द शरद पवार या कार्यक्रमाला होते. जगतापांनी पवारांचे कौतुक करत माजी मंत्री तथा शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांना जिल्ह्यात सध्या सुरू असलेल्या राजकारणाचा आमच्या सारख्यांना विट आला आहे. जिल्ह्यात सुरु असलेली गडबड थांबवा, सारेजण झाले गेले विसरून जावूया. जयंतराव सर्वाना सोबत घ्या, सर्वांची एकत्र मोट बांधा व आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूक ताकतीने लढवूया असे आवाहन केले. त्यांच्या या आवाहनानंतर खुद्द शरद पवारांनी जगताप यांना त्यांच्या गाडीत बसविले. त्या दरम्यान झालेल्या चर्चेत पवारांनी पक्षाचे काम करा अशी ऑफर जगताप यांना दिली आहे.

एकूणच घायाळ झालेले जगताप हे भाजप विरोधात मोर्चेबांधणी करत असले तरी बेरजेचे राजकारण कसे जुळते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज