vita crime news : विटयात पिसाळलेल्या कुत्र्याने घेतला 26 जणांचा चावा : विटा शहरातील विवेकानंदनगर परिसरात पिसाळलेल्या कुत्र्याने तब्बल 26 हून अधिक चावा घेऊन धुमाकूळ घातल्याने विटा शहरात एकच खळबळ उडाली आहे. तर विवेकानंदनगर बसस्टॉपच्या पाठीमागे एका महिलेवर या पिसाळलेल्या कुत्र्याने हल्ला केला. त्यावेळी महिलेच्या पतीसह सतर्क नागरिकांनी प्रसंगावधान दाखवून या कुत्र्याच्या डोक्यात फरशीने वार करून कुत्र्याला ठार केले.
vita crime news : विटयात पिसाळलेल्या कुत्र्याने घेतला 26 जणांचा चावा
दरम्यान आज सत्ताधारी पाटील गटाच्या नगरसेवकांच्या आणि कार्यकर्त्याच्या टीमने तातडीने विवेकानंदनगर परिसरातील जखमी नागरिकांची भेट घेऊन विटा नगरपालिकेच्या प्रशासनाच्या कामगिरीवर आक्षेप घेत प्रशासनावर जोरदार हल्लाबोल केला. वारंवार तक्रारी करूनही निर्ढावलेल्या पालिका प्रशासनाला जाग आणण्यासाठी पाटील गटाचे नगरसेवक उद्या प्रशासकीय अधिकार्यांना घेराव घालण्याचा इशारा दिला आहे.
विटा – कराड रस्त्यावरील नेवरी नाक्यापासून पुढे असणार्या विटा हायस्कूल विवेकानंदनगर आणि शाहूनगर परिसरात शनिवारी 1 फेब्रुवारी रोजी सायंकाळी अचानक पिसाळलेल्या कुत्र्याने धुमाकूळ घालत एकाचवेळी तब्बल 35 हून अधिक नागरिकांवर हल्ला चढवल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. केवळ नागरिकांवर नव्हे तर रस्त्यावरील कुत्र्यांसह दारात बनलेल्या जनावरांसह पाळीव कुत्र्यांचा या पिसाळलेल्या
कुत्र्याने चावा घेतल्याने हा परिसर अक्षरशः हादरून गेला आहे.
विवेकानंदनगर बसस्टॉपच्या पाठीमागील एका घरासमोर या पिसाळलेल्या कुत्र्याने महिलेवर हल्ला केला. त्यावेळी महिलेच्या पतीसह आसपासच्या नागरिकांनी या कुत्र्याच्या डोक्यात फरशीने वार करून कुत्र्याला मारून टाकले. त्यानंतर विटा नगरपालिकेच्या कर्मचार्यांनी तातडीने कुत्र्याची विल्हेवाट लावली.
या हल्ल्यानंतर रात्री बारा वाजेपर्यंत 26 ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आली असून यापैकी गंभीर इजा असणार्या 13 रुग्णांना पुढील उपचारासाठी सांगलीतील रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. तर कुत्र्याच्या हल्ल्यामुळे पिसाळलेल्या कुत्र्याने नागरिकांसह रस्त्यावरील कुत्र्यांवर आणि पाळीव प्राण्यांवर देखील हल्ला चढवल्याने या परिसरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.