rajkiyalive

sangli news : मायाक्का चिंचणी ते सांगली हुल्लडबाजी करणार्‍या तरुणांना चोप : 35 जण किरकोळ जखमी.

sangli news : मायाक्का चिंचणी ते सांगली हुल्लडबाजी करणार्‍या तरुणांना चोप : 35 जण किरकोळ जखमी. : सांगली : कर्नाटकातील चिंचली येथे माघी पौर्णिमेला मायाक्कादेवीची यात्रा संपल्यावर घरी परताना हुल्लडबाजी करणार्‍या सांगलीवाडीतील तरुणांना पोलिसांनी चांगलाच चोप दिला. यामध्ये पस्तीसजण किरकोळ जखमी झाले. काहींना गाड्या रस्त्यावर टाकून पळ काढला. सांगली ग्रामीण पोलीस ठाण्याचे निरीक्षक किरण चौगले यांच्यासह पथकांनी हुल्लडबाजी करणार्‍यांना धारेवर धरले.

sangli news : मायाक्का चिंचणी ते सांगली हुल्लडबाजी करणार्‍या तरुणांना चोप : 35 जण किरकोळ जखमी.

चिंचलीला बैलगाडीतून किंवा घोडागाडीतून शेकडो भाविक परंपरेप्रमाणे जात असतात. आता त्याच्या जोडीला दुचाकी मोठ्या प्रमाणात असतात. यात्रा संपल्यावर भाविक घरी परतत असतात. याचवेळी घोडागाड्या पळवत आणताना त्यासोबत दुचाकीही असतात. असे प्रत्येकवर्षी असते. रविवारी रात्री शेकडो तरुण दुचाकीवरून सांगलीवाडीकडे परतत होते. रात्री दोनच्या सुमारास संपूर्ण शहर झोपेत असताना तरुण हॉर्न वाजवत, घोषणाबाजी करीत होते.

दरम्यान, हुल्लडबाजी करणार्‍या तरुणांना चाप लावण्यासाठी यंदा पोलिसांनी हरभट रोड, टिळक चौकात फिल्डिंग लावली होती. दोन वाजता गाड्या हॉर्न वाजवत येताच पोलिसांनी लाठीचा प्रसाद देण्यास सुरूवात केली. सांगली ग्रामीणचे निरीक्षक किरण चौगले, शहर पोलिस ठाण्याकडील गुन्हे प्रकटीकरण विभागाच्या कर्मचार्‍यांनी हुल्लडबाजी करणार्‍या तरुणांना चांगलाच चोप दिला. पोलिसांचा मार पाहून अनेकजण गाड्या टाकून वाट दिसेल तिकडे पळत सुटले.

लाठीचा मार बसलेले तीस ते पस्तीस जण जखमी झाले. घोडागाड्यांच्या बरोबर असणारे सहीसलामत निसटून गेले काही तरुणांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांना समज देऊन सकाळी सोडून दिले. याबाबत पोलिसांत गुन्हा दाखल झालेला नाही.

गेल्या 20 वर्षांपासून घोडा गाडी पळविण्याची प्रथा…
चिंचली ते सांगलीवाडी पासष्ट किलोमीटरचे अंतर आहे. यात्रा संपल्यानंतर म्हैसाळ येथे सर्व घोडागाड्या एकत्र येतात, तेथून निघाले की सांगलीवाडीत येऊन गाड्या थांबतात. गेल्या 20 वर्षांपासून यात्रा संपल्यानंतर घोडागाडी पळविण्याची प्रथा आहे. दोन वर्षापूर्वी कर्नाटक पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला होता. त्यानंतर गतवर्षी रात्री आठ, नऊच्या सुमारास गाड्या सांगलीवाडीत आल्या होत्या. यंदा मात्र पुन्हा तोच प्रकार घडल्याने पोलिसांनी लाठीचा प्रसाद दिला.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज