jayant patil news : 21 फेबु्रवारी रोजी मनोरंजनाची हास्यजत्रा इस्लामपुरात : माजी मंत्री आ.जयंतराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त राजारामनगर (ता.वाळवा) येथील आविष्कार कल्चरल ग्रुपचा 23 वा संगीत महोत्सव शुक्रवार दि.21 व शनिवार दि.22 फेब्रुवारी 2025 रोजी सायंकाळी 7 वाजता इस्लामपूर येथील खा.एस.डी.पाटील नगरातील विद्यामंदीर हायस्कुलच्या प्रांगणात आयोजित केलेला आहे. दि.21 रोजी संपूर्ण महाराष्ट्राला लोटपोट हसविणारी ’मनोरंजनाची हास्य यात्रा’हा कार्यक्रम,तर दि.22 रोजी कोमल कृष्णा प्रस्तुत ’सितारोंकी मेहफिल’हा बहारदार हिंदी-मराठी गीतांचा कार्यक्रम होणार आहे. ही माहिती आविष्कारचे अध्यक्ष प्रा.कृष्णा मंडले यांनी दिली.
jayant patil news : 21 फेबु्रवारी रोजी मनोरंजनाची हास्यजत्रा इस्लामपुरात
’मनोरंजनाची हास्य यात्रा’मध्ये चतुरस्त्र कलाकार समीर चौघुले,प्रसाद खांडेकर, वनिता खरात,नम्रता संभेराव,रसिका वेंगुर्लेकर,चेतना भट,प्रभाकर मोरे,दत्तू मोरे, प्रथमेश शिवलकर हे परफॉर्म करणार आहेत. नृत्यांगना मिरा जोशी यांचा लावणी नृत्याविष्कार,सिनेअभिनेते पुष्कर श्रोत्री यांचे सूत्र संचालन आणि अधून-मधून सुमधुर गीतां चा शिडकाव असा हा कार्यक्रम होणार आहे.

90 च्या दशकातील व नव्या बहारदार गाण्यांचा नजराणा पेश केला जाणार आहे.
कोमल कृष्णा प्रस्तुत ’सितारों की मेहफिल’ मध्ये इंडियन आयडॉलफेम अंकुश भारद्वाज, कोमल कृष्णा(पुणे),निरुपमा डे (मुंबई), श्रीशान वाडेकर (मुंबई) यांचा हिंदी-मराठी गीतांचा संगीत रजनी होणार आहे. मुंबईचा नामवंत वाद्यवृंद सहभागी होणार असून संगीत संयोजन मंदार राजपूत करीत आहेत. 90 च्या दशकातील व नव्या बहारदार गाण्यांचा नजराणा पेश केला जाणार आहे.
माजी मंत्री आ.जयंतराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या 22 वर्षापासून आविष्कार कल्चरल ग्रुप सांस्कृतिक क्षेत्रात कार्यरत आहे.
आविष्कारने पंडीत जसराज, राहुल देशपांडे,उदित नारायण,श्रेया घोषाल, शंकर महादेवन,अभिजित भट्टाचार्य,बप्पी लहरी,पद्मश्री पद्मजा फेणाणी,महेश काळे, अशोक हांडे यांच्यासह साधारण 90 पेक्षा जास्त संगीत मैफिलींचे आयोजन केले आहे. आविष्कारने राज्याच्या सांस्कृतिक क्षेत्रात स्वतःची ओळख निर्माण करीत आपल्या परिसरात कौटुंबिक दालन उभा करण्यात यश मिळविले आहे.

कार्याध्यक्ष भूषण शहा,उपाध्यक्ष इंजि. राजेंद्र माळी,सचिव विजय लाड,सहसचिव विजय नायकल,खजिनदार विश्वास कदम, तसेच माजी अध्यक्ष सतिश पाटील,सुनिल चव्हाण,जिल्हा मजूर फेडरेशनचे संचालक संतोष पाटील,माजी कार्याध्यक्ष प्रा.प्रदीप पाटील,माजी खजिनदार धनंजय भोसले, माजी सचिव विश्वनाथ पाटसुते,विनायक यादव,लव्हाजी देसाई,महेश पाटील,ज्ञानदेव देसाई,हर्षवर्धन घोरपडे,सौरभ सावंत,अजय थोरात,श्रेयस पाटील,प्रताप कवठेकर यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.



