mahankali karkhana news : महांकाली साखर कारखाना निवडणूकीत अवैध अर्ज निर्णयाला उच्च न्यायालयाची स्थगिती : कवठेमहांकाळ येथील श्री महांकाली सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकी साठी उभ्या असलेल्या 104 उमेदवारांचे अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी अवैध ठरवले होते. त्यांच्या या निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अमित बोरकर यांनी स्थगिती दिली आहे. न्यायालयाचा निर्णय सभासदांच्या हिताचा असल्याची प्रतिक्रिया कारखान्याच्या अध्यक्षा अनिताताई सगरे यांनी दिली.
mahankali karkhana news : महांकाली साखर कारखाना निवडणूकीत अवैध अर्ज निर्णयाला उच्च न्यायालयाची स्थगिती
महांकाली साखर कारखान्याची निवडणूक जाहीर झाली होती. या निवडणुकीसाठी 104 उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. 14फेब्रूवारी रोजी उमेदवारांच्या अर्जांची छाननी झाली. या छाननीत निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी कारखान्याच्या पोटनियमातील तरतूदीनुसार निवडणूकीत उभा राहण्याकरिता तीन हंगामाच्या कालावधीसाठी उमेदवारांनी ऊस पुरवठा न केल्याचे कारण लक्षात घेऊन सर्वच्या सर्व 194 उमेदवारी अर्ज अवैध ठरवले होते.

महांकाली साखर कारखाना हा गेल्या पाच वर्षापासून बंद असल्याने ऊस पुरवठा करणार्याचा प्रश्नच येत नसल्याने निवडणूक निर्णय अधिकार्यांच्या अर्ज अवैध निर्णयाविरूध्द अनिता विजयकुमार सगरे व इतरांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेचे कामकाज न्यायमूर्ती अमित बोरकर यांच्या समोर मंगळवारी पार पडले. या कामकाजात चर्चा होऊन न्यायालयाच्या पुढील आदेशापर्यंत विद्यमान संचालक मंडळ कायम राहील तसेच प्रतिवादींना 18 मार्च रोजी पर्यंत नोटिसा द्याव्यात, असा निर्णय दिला.
याचिकाकर्त्यांतर्फे ड सुरेश एस शहा, शुभम एन शिंदे आणि इशांत कापसे यांनी काम पाहिले. राज्य सरकारतर्फे ड. एस डी रायरीकर व केंद्र सरकारतर्फे विनीत जैन, अशोक वर्मा यांनी काम पाहिले. तर प्रतिवादी तर्फे शिवाजी मासाळ यांनी काम पाहिले.

महांकाली साखर कारखान्याच्या निवडणुकीतील सर्व अर्ज अवैध ठरविण्यात आल्या नंतर आपण महांकाली साखर कारखान्याचे सभासद, शेतकरी यांच्या हिताकरिता मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. निवडणूक निर्णय अधिकार्यांच्या निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयाने स्थगिती दिल्याने सभासदांना न्याय मिळाला आहे, अशी प्रतिक्रिया कारखान्याच्या चेअरमन अनिता वहिनी सगरे यांनी दिली.

Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.



