miraj news : म्हैसाळमध्ये कर्नाटकची बस झाली उलटून 24 प्रवासी जखमी: मिरज तालुक्यातील म्हैसाळ येथे के.मार्ट बाजार जवळ कर्नाटक राज्यातील (के.ए.23 एफ 1005) या क्रमांकाची एस.टी.बस आणि कागवाडहून म्हैसाळकडे येणारा (एम.एच.10 डी.एन.9557) या क्रमांकाचा मोकळा ट्रॅक्टर याची समोरा समोर धडक बसल्याने एस.टी. पलटी होवून30 फूट खोल खड्ड्यात पडून एस.टीमधील 24 प्रवाशी जखमी झाले.
miraj news : म्हैसाळमध्ये कर्नाटकची बस झाली उलटून 24 प्रवासी जखमी
एस.टी.चालकाचा पाय फ्रॅक्चर झाला असून त्याला खासगी रूग्णालयाात उपचार करण्यासाठी दाखल करण्यात आले. या एस.टी.बसमधून 40 प्रवासी प्रवास करीत होते. सुदैवाने जीवनहानी झाली नाही. या घटनेची नोंद मिरज ग्रामीण पोलिसात झाली आहे.

चालकाचे नियंत्रण सुटल्याने बाजुला असलेल्या तीस फुट खोल खड्ड्यात दोन वेळा पलटी होवून खाली पडली.
म्हैसाळ येथे कर्नाटक एस.टी.बस कागवाडे जात असताना कागवाडहून म्हैसाळकडे येणारा ट्रॅक्टरची के.मार्ट बाजार जवळ धडक झाल्याने कर्नाटक एस.टी.चालकाचे नियंत्रण सुटल्याने बाजुला असलेल्या तीस फुट खोल खड्ड्यात दोन वेळा पलटी होवून खाली पडली. एस.टी.बस पलटी झाल्याचे समजल्यानंतर एस.टी.मध्ये बसलेल्या प्रवाशांनी आरडाओरडा सुरू केला.
सर्वत्र धुळ पसरली होती. एस.टी. पलटी झाल्याने मोठा आवाज झाला.
म्हैसाळ मधील नागरीकांनी त्या एस.टी.कडे धाव घेतली. त्यावेळी एस.टी.बसून वाचवा वाचवा, तसेच मोठ्याने रडण्याचा आवाज येत होता. सर्व प्रवाशी घाबरलेल्या स्थितीत होते. गोळा झालेल्य नागरीकांनी तात्काळ तेथे धाव घेतली.

पलटी झालेल्या बसची फुढची काच फोडण्यात आली. आतील प्रवाशांना बाहेर काढण्यात आले.
तसेच नागरीकांनी समयचुकता पाहून रूग्णवाहिका बोलाविण्यात आली. अनेक बाहेर काढण्याचे काम युध्द पातळीवर सुरू होते. काही जखमी रूग्णांना रूग्णवाहिकेतून उपचारासाठी पाठविण्यात येत होते. एस.टी.चालक हा आतील स्टेरींगमध्ये अडकलेला होता. त्याचा पाय अडकल्याने त्यांना काढताना मोठा प्रयत्न करावा. लागला. एस.टी. चालकाच्या पायाला गंभीर दुखापत झाली असून त्यास खासगी रूग्णालयास उपचारासाठी दखल करण्यात आले.
जखमी 21 प्रवाशांना शासकीय रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
एस.टी. पलटी झाल्यानंतर एस.टी.मधील 24 प्रवासी हे एस.टी.तील आसनाचे लोखंडी ऍगल, लोखंडी पाईप लागून किरकोळ जखमी झाले आहेत. कोणाच्या पायाला, हाताला, बोटाला, गुडघ्याला, डोक्याला, पोटाला खरचटले आहे.
जखमींमध्ये राझिया बागवान, रवी चव्हाण, अप्पू कुंभार, कल्पना जाधव, मल्लम्मा येतनावर, शांताबाई चव्हाण, कविता चव्हाण, राजेंद्र धुना, गिरजम्मा कुडी, श्रीपाद खोत, प्रज्ञा खोत, शिवाजी चव्हाण, इम्रान अहमद, वन्नव्वा व्हसपुरे, अर्जुन कोळी, सन्नाक्का बंडगीरे, फामीरा लोहाणी, प्रितम तनवरे, शिवलिंग बालाजी, अरबाज, कुडचीकर, अफसाना कुडचीकर, राजु, रज्जाक बागवान यांचा जखमींमध्ये समावेश आहे.
जखमी प्रवासी हे आपआपल्या नातेवाईकांना मोबाईलवर घडलेली माहिती सांगून बोलावून घेत होते. काहींचे नातेवाईक तात्काळ दाखल झाले होते.
अपघाताची घटना गंभीर होती. दैव बलवत्तर म्हणून कोणतीही जीवतहानी झाली नाही.
घटनास्थळी पोलिसांचा फौजफाटा दाखल झाला होता. म्हैसाळमध्ये एस.टी. बस पलटी झाल्याची माहिती वार्यासारखी सर्वत्र पसरली आणि बघ्यांची मोठी गर्दी झाली. पोलिसांनी जखमींना तात्काळ उपचारासाठी पाठवून रस्ता रहदारीस मोकळा केला. एस.टी.ची मोठे नुकसान झाले आहे. या अपघाताची नोंद मिरज ग्रामीण पोलिसात झाली आहे

Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.



