rajkiyalive

vishal patil news : खा. विशाल पाटील व प्रतिक पाटील यांच्यातील सलोखा वाढला

vishal patil news : खा. विशाल पाटील व प्रतिक पाटील यांच्यातील सलोखा वाढला

vishal patil news : खा. विशाल पाटील व प्रतिक पाटील यांच्यातील सलोखा वाढला : लोकसभा, विधानसभा असो की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, महाविकास आघाडीत एकत्र असले तरी जिल्ह्यात दादा-बापू गटामध्ये जोरदार संघर्ष असतो. पण सध्या जिल्ह्यातील झालेल्या महाविकास आघाडीची अवस्था पाहून आता दादा-बापू वादाच्या संघर्षाला पूर्णविराम मिळावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. राजारामबापू पाटील संस्थेच्या दोन कार्यक्रमांना खा. विशाल पाटील यांना आ. जयंत पाटील यांचे पूत्र प्रतिक पाटील यांनी निमंत्रित दिले. खा. विशाल पाटील यांनी देखील झाले गेले विसरून दोन्ही कार्यक्रमांना हजेरी लावली. त्यामुळे दोन्ही पाटलांमध्ये आता सलोखा वाढला आहे. दोन्ही गट एकत्र झाल्यास महाविकास आघाडीला ताकद मिळणार आहे.

vishal patil news : खा. विशाल पाटील व प्रतिक पाटील यांच्यातील सलोखा वाढला

दादा-बापू गट एकत्र येणार: महाविकास आघाडीला ताकद मिळणार

महाराष्ट्राच्या राजकारणात 1970 च्या दशकात वसंतदादा पाटील आणि राजारामबापू पाटील यांच्यातील राजकीय संघर्ष राज्याने पाहिलेला आहे. जुन्या-जाणत्या लोकांच्या मनात अजूनही त्या आठवणी जाग्या आहेत. या संघर्षाला जरी चांदोली धरणाचे निमित्त होते, तरी मूळ संघर्ष हा राज्याच्या आणि जिल्ह्याच्या राजकारणावरील राजकीय वर्चस्वासाठी होता. दादांच्या नंतर स्व. विष्णूअण्णा पाटील, स्व. प्रकाशबापू पाटील आणि स्व. मदन पाटील या दादांच्या दुसर्‍या पिढीने राज्याच्या आणि जिल्ह्याच्या राजकारणात मजबूत पायाभरणी केली, तर बापूंची दुसरी पिढी आ. जयंत पाटील यांच्या रूपाने राजकारणात सक्रिय झाली. मात्र, मागील पिढीतील संघर्ष पुढच्या पिढीतही सुरूच राहिला.

vishal-patil-news-the-reconciliation-between-vishal-patil-and-pratik-patil-increased

आ. जयंत पाटील जिल्ह्याच्या राजकारणात डोईजड होत गेले. जिल्ह्याच्या राजकारणात हातपाय पसरले. दादा घराण्याच्या ताब्यात असलेल्या सांगली जिल्हा परिषद, महापालिका, जिल्हा बँक, बाजार समिती अशा जिल्हाव्यापी संस्थांवर चांगलीच मांड ठोकली. त्याचप्रमाणे एकेकाळी दादा गटाचा बालेकिल्ला असलेले सांगली लोकसभा आणि विधानसभा हे दोन्ही मतदारसंघ भाजपच्या पारड्यात पाडण्यासाठी हातभार लावल्याची खुली चर्चा चालते. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत देखील हाच प्रकार झाल्याची चर्चा सुरू आहे. पण खा. विशाल पाटील यांनी यावर मात करत दादा घराण्याने सांगलीचा गड ताब्यात घेतला. त्यानंतर आ. जयंत पाटील व खा. विशाल पाटील यांच्यात नव्याने संघर्ष सुरू झाला. पण विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यात व राज्यात महाविकास आघाडीला घरघर लागले. गेल्या दोन महिन्यापासून महाविकास आघाडीचे नेते कोमात आहेत.

खा. विशाल पाटील यांनी एका जाहीर कार्यक्रमात आ. जयंत पाटील यांनी महाविकास आघाडीचे नेतेपद स्वीकारावे.

भाजपविरोधात लढण्यासाठी सर्वांना एकत्रित करावे. आम्ही त्यांच्याबरोबर राहू, असे जाहीर विधान केले होते. जिल्ह्यात भाजपची ताकद वाढली आहे. त्यामुळे खा. विशाल पाटील यांनी महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेले काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष, शिवसेना उध्दव ठाकरे पक्षाने एकत्रित यावे, असे आवाहन केले होते. या आवाहनाला आ. जयंत पाटील यांचे पूत्र, राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष प्रतिक पाटील यांच्याकडून प्रतिसाद देत आहेत. या आठवड्यात ‘आरआयटी’च्या आंतरराष्ट्रीय विद्यार्थी वसतीगृह व जिम्नॅशिअमचे उद्घाटन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमाला खा. विशाल पाटील यांना देखील आमंत्रित करण्यात आले होते. खा. विशाल पाटील यांनी देखील प्रतिसाद देत कार्यक्रमाला हजेरी लावली होती.

vishal-patil-news-the-reconciliation-between-vishal-patil-and-pratik-patil-increased

त्यानंतर खुले नाट्यगृहात एक्सप्रोचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला देखील खा. विशाल पाटील यांना निमंत्रित करण्यात आले होते. याला देखील खा. विशाल पाटील यांनी हजेरी लावली. या आठवड्यात दोनवेळा खा. विशाल पाटील यांनी आ. जयंत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त घेतलेल्या कार्यक्रमांना हजेरी लावली आहे. त्यामुळे खा. विशाल पाटील व प्रतिक पाटील यांच्यात सलोखा वाढत चालला आहे. यापूर्वीचा देखील दादा-बापू वाद हा कायमचा मिटला पाहिजे, त्यासाठी त्यांनी प्रयत्न सुरू केले. जिल्ह्यात दादा-बापू वाद नसल्याचे स्पष्टीकरण प्रतिक पाटील यांनी देखील यापूर्वी केले आहे. त्यामुळे या वादाला आता पूर्णविराम मिळावा, अशी भावना महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांतून व्यक्त होत आहेत.

आ. जयंत पाटील यांच्या पुढाकाराची गरज…
जिल्ह्यात काँग्रेस व राष्ट्रवादी कॉँग्रेसचे एकहाती नेतृत्व होते. मात्र जिल्ह्यात दादा-बापू राजकीय वादात दोन्ही पक्षाची ताकद कमी झाली आणि भाजपची ताकद वाढली. जिल्हा भाजपचे चार आमदार आहेत. जिल्हा परिषद व महापालिका या दोन महत्वाच्या संस्थांवर भाजपने झेंडा फडकवला होता. आ. जयंत पाटील यांना देखील विधानसभेला फटका बसला आहे. भाजपला रोखण्यासाठी आ. जयंत पाटील यांच्या पुढाकाराची गरज आहे. दादा-बापू वाद मिटवून एकदिलाने आ. जयंत पाटील, आ. विश्वजीत कदम व खा. विशाल पाटील यांनी काम करणे आवश्यक आहे. तरच भविष्यात महाविकास आघाडीला चांगले दिवस येतील.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज