jayant patil news : जयंत चषक बूथ क्रमांक 108 ने पटकावला : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष, माजी मंत्री आ.जयंतराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त इस्लामपूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने येथील पोलीस परेड ग्राउंडवर आयोजित जयंत चषक क्रिकेट स्पर्धेत बूथ क्रमांक 108 ने प्रथम क्रमांक पटकाविला.
jayant patil news : जयंत चषक बूथ क्रमांक 108 ने पटकावला
स्पर्धेतील सर्व विजेते संघ व उत्कृष्ठ खेळ केलेल्या खेळाडूंना आ.जयंतराव पाटील यांच्या हस्ते बक्षिस देवून गौरविण्यात आले. सात दिवस चाललेल्या या स्पर्धेस खेळाडू व क्रिकेटप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला आहे. भविष्यात विविध खेळ व खेळाडूंना अधिक प्रोत्साहन देवू, अशी ग्वाही आ.पाटील यांनी याप्रसंगी दिली.

jayant-patil-news-jayant-cup-was-won-by-booth-number-108
प्रथम विजेता संघ- बूथ क्रमांक 108 (अध्यक्ष मिलिंद पाटील),द्वितीय विजेता संघ- बूथ क्रमांक 106 (अध्यक्ष सचिन कोळी), तृतीय विजेता संघ- बूथ क्रमांक 123 (अध्यक्ष संभाजी बाबर),चतुर्थ विजेता संघ- बूथ क्रमांक 129 (अध्यक्ष विजय जाधव), विजेत्या संघांना अनुक्रमे रुपये 25 हजार, रुपये 15 हजार, रुपये 10 हजार, रुपये 7 हजार रोख रक्कम,तसेच भव्य सन्मान चिन्ह बक्षीस देण्यात आले.
युवा खेळाडू यश पाटील यांनी या स्पर्धेत 106 धावा व 6 विकेटचा खेळ करीत स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडूचा मान पटकाविला. उत्कृष्ठ खेळाडू- बेस्ट बॉलर- विशाल केसरकर (7 विकेट),बेस्ट बॅट्समन- दिग्विजय जाधव (94 धावा), अंतिम सामन्यातील मॅन ऑफ मॅच-निहाल मुल्ला (सलग चार चौकार).

याप्रसंगी माजी नगराध्यक्ष अँड.चिमण भाऊ डांगे,शहराध्यक्ष शहाजी पाटील, उपजिल्हा रुग्णालयाचे अधिक्षक डॉ.संजय हरदास साहेब,बाळासाहेब पाटील,सुभाषराव सुर्यवंशी,युवा नेते संदीप पाटील,संचालक शैलेश पाटील,अरुण कांबळे,विश्वनाथ डांगे, शंकरराव चव्हाण,शंकरराव पाटील,सुनिल मलगुंडे,आयुब हवलदार,आबीद मोमीन, संजय जाधव प्रामुख्याने उपस्थित होते.
jayant-patil-news-jayant-cup-was-won-by-booth-number-108
माजी युवक शहराध्यक्ष सचिन कोळी, रणजित गायकवाड,शकील जमादार,गुरू माने,राजू बाणेकर,प्रदीप थोरात,अभिजित भगवान पाटील,अकबर मुंडे,सुरज कचरे, प्रतिक नायकल यांच्यासह युवक कार्यकर्त्यां नी स्पर्धेचे उत्तम संयोजन केले. रावसाहेब चव्हाण,विनोद शिंदे,अस्पाक मुल्ला,संभाजी बाबर,मनोज पवार,राजेंद्र पाटील,सुहास पाटील,हरिश्चंद्र रोकडे यांनी पंच म्हणून जबाबदारी पार पाडली. महादेव लाखे यांनी स्पर्धेचे उत्तम समालोचन केले.
प्रदर्शनीय सामान्यांनी स्पर्धेस रंगत!
युवा नेते प्रतिकदादा पाटील यांच्या संकल्पनेतून गेल्या वर्षांपासून ही बूथ वाइज क्रिकेट स्पर्धा घेतली जात आहे. गेल्या वर्षी केवळ नगरसेवक विरुध्द पत्रकार असा प्रदर्शनीय सामना झाला. मात्र यावर्षी पत्रकार,नगसेवक यांच्यासह कारखाना,बँक, संघाचे संचालक,डॉक्टर,वकील,न्यायालयीन कर्मचारी,नगरपालिका कर्मचारी आदी संघात प्रदर्शनीय सामने झाले. स्वतः प्रतिकदादा हे कारखाना संचालक मंडळ संघातून खेळले.

Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.



