sanjaykaka patil news : संजयकाकांचा भाजप प्रवेश कधी…? : लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी माजी खासदार संजय काका पाटील यांनी भाजप सोडून घड्याळ हाती बांधले. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला मात्र विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर संजयकाका पुन्हा भाजप स्वगृही परतणार अशा चर्चा गेली महिनाभर सुरू आहेत.
sanjaykaka patil news : संजयकाकांचा भाजप प्रवेश कधी…?
नुकतीच भाजपच्या सदस्य नोंदणीसाठी काका गटाची बैठक झाली. भाजप सदस्य नोंदणी जोमाने करण्याचे आवाहन त्यांनी केले मात्र संजय काकांनी अजूनही भूमिका जाहीर केली नाही. त्यामुळे कार्यकर्ते संभ्रमात तर भाजप प्रवेशाच्या नुसत्या चर्चाच अद्याप सुरु आहेत मात्र त्यांची सदस्य नोंदणीच झाली नसल्याचे बोलले जात आहे.

लोकसभा निवडणुकीत भाजपकडून सलग दोनवेळा विजयी झालेल्या व हेट्रिक करण्याच्या प्रयत्नात असणार्या संजयकाकांना तिसर्यांदा पराभवाचा सामना करावा लागला. त्यानंतर राजकीय भवितव्यासाठी संजयकाकांनी जिल्ह्याच्या राजकारणावरून पुन्हा स्वतःच्या होमग्राउंड वर लक्ष केंद्रित केले. मुलगा प्रभाकर याला तासगाव कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचे निश्चित केले.
sanjaykaka-patil-news-when-will-sanjaykaka-join-bjpz
महायुतीच्या जागा वाटपाच्या फॉर्मुल्यात हा मतदारसंघ उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडे गेला. व तुम्हीच उमेदवार वा ही अट ठेवल्याने संजयकाकांनी निवडणुकीच्या तोंडावर भाजप सोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. हाय होल्टेज ठरलेल्या या निवडणुकीत देखील त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. सलग दोन पराभव काका गटाच्या जिव्हारी लागला. या पराभवानंतर संजयकाकांसह त्यांचे पदाधिकारीदेखील राष्ट्रवादीत सक्रिय नसल्याचे दिसत होते.

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या बाबतीत संजय काकांची भूमिका काय याची चर्चा होत होती. मागील आठववड्यात त्यांच्या कार्यकर्त्यांची बैठक घेतली. या बैठकीत भाजपचे सदस्य नोंदणी अभियान प्रभावीपणे राबविण्याचे आवाहन केले. मतदारसंघात 60 हजार सदस्य नोंदणी पूर्ण झाली पाहिजे, असेही सांगितले.
sanjaykaka-patil-news-when-will-sanjaykaka-join-bjp
यानंतर काका गटाच्या प्रमुख पदाधिकार्यांनी सदस्य नोंदणीसाठी सुरुवात केली. अधिकृतपणे संजयकाका पाटील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहेत. मात्र त्यांनी भाजपच्या सदस्य नोंदणीसाठी आवाहन केले. त्यामुळे संजयकाका पुन्हा एकदा राजकीय भूमिका बदलणार असल्याची चर्चा मतदारसंघात सुरू आहे. विधानसभा निवडणुकीच्या पराभवानंतर संजयकाका पुन्हा भाजपच्या वाटेवर असल्याचे गेले महिनाभर बोलले जात आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी ते पुन्हा भाजपमध्ये परततील अशीही चर्चा आहे. मात्र काका गटाचे कार्यकर्ते त्यांनी कोणतीही भूमिका जाहीर केली नसल्यामुळे अद्याप संभ्रमात असल्याचे दिसून येत आहे.

Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.



