jayant patil news : अंकुश भारद्वाजच्या सळसळत्या जोशाने इस्लामपूरकर मंत्रमुग्ध: ’इंडियन आयडॉल’फेम अंकुश भारद्वाज हा इस्लामपूर येथील आविष्कार कल्चरल ग्रुप च्या 23 व्या संगीत महोत्सवास आला,गायला आणि 5-6 कलारसिकांची मने जिंकून गेला…
jayant patil news : अंकुश भारद्वाजच्या सळसळत्या जोशाने इस्लामपूरकर मंत्रमुग्ध
अंकुश भारद्वाज यांनी दिलसे रे,दिवाना तेरा,ए दिल दिवाना,बदन पे सितारे,संदेशे आते है,मितवा,गुलाबी साडी आणि लालेलाल अशी एकापेक्षा एक सरस गाणी सादर करीत कला रसिकांना मंत्रमुग्ध केले. रसिकांनीही त्याचा गोड आवाज आणि त्याचा जोश पाहून त्याला टाळ्या,शिट्या आणि मोबाईलचे टॉर्च लावून सातत्याने प्रोत्साहन दिले…त्याच्या साथीला होते,प्रसिध्द गायिका कोमल कृष्णा (पुणे), निरुपमा डे (मुंबई), श्रीशान वाडेकर (मुंबई)..
माजी मंत्री आ.जयंतराव पाटील,तसेच वाळवा,शिराळा व पलूस तालुक्यातील कला रसिकांनी सहपरिवार या मैफिलीचा मनसोक्त आनंद घेतला.
ख्वाबो कैहना ही क्या, खेळ मांडीयेला,एक दोन,तीन,हाय मेरी परम सुंदरी, परदेशीया, चोली के पिछे क्या है,बचना ये हसिनो,जानू मेरी जान,चुम्मा-चुम्मा दे-दे,लैला है लैला आदी अनेक सुंदर गाणी याप्रसंगी सादर करण्यात आली. अभिनंदन यांनी कार्यक्रमाचे प्रभावी सूत्र संचालन केले. तर मंदार राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली 40 विविध वादकांनी सुंदर संगीत दिले.
jayant-patil-news-islampurkar-enchanted-by-ankush-bhardwajs-fiery-passion
यावेळी आ.जयंतराव पाटील यांच्या हस्ते कलाकारांचा सन्मान करण्यात आला. कार्यकारी संचालक आर.डी.माहुली प्रामुख्याने उपस्थित होते.प्रारंभी राजारामबापू दूध संघाचे अध्यक्ष नेताजीराव पाटील यांच्या हस्ते लोकनेते राजारामबापू पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन करण्यात आले. उपाध्यक्ष शशिकांत पाटील,अतुल पाटील,एस.डी.कोरडे,विकास कर्डिले उपस्थित होते. कार्याध्यक्ष भूषण शहा यांनी स्वागत व प्रास्ताविक केले.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष देवराज पाटील,अँड.धैर्यशिल पाटील यांच्यासह हजारो कला रसिकांनी या कार्यक्रमाचा मनमुराद आनंद लुटला. आविष्कारचे प्रमुख मोहन चव्हाण,अध्यक्ष प्रा.कृष्णा मंडले,उपाध्यक्ष राजेंद्र माळी,सचिव विजय लाड,विश्वास कदम,सचिनकाका पाटील,सतिश पाटील,सुनिल चव्हाण,डी.बी. पाटील,धनंजय भोसले,हर्षवर्धन घोरपडे, विनायक यादव,लव्हाजी देसाई,संजय पाटील (इंजि),अनिल पाटील,विश्वजित पाटील,अक्षय जाधव,विशाल पाटील,बालाजी पाटील,प्रशांत पाटील,किरण पाटील,प्रताप कवठेकर,सचिन शिंगटे यांच्या सह आविष्कारच्या कार्यकर्त्यां नी कार्यक्रमाचे उत्कृष्ठ नियोजन केले.
आ.जयंतराव पाटील व कलाकारांची परिक्षा।
कार्यक्रम संपल्यानंतर आ.पाटील यांच्या हस्ते कलाकारांचा रंगमंचावर जाऊन सन्मान करण्यात आला. यावेळी आ.पाटील यांनी एका-एका कलाकारास विना संगीत गाणे सादर करण्याची फर्माईश केली. चारी कलाकारांनी सुंदर गाणी गात सर्वाना भारावून सोडले. या कलाकारांनी सातत्याने भारत माता की,छत्रपती शिवाजी महाराज की अशा घोषणा देत देशभक्तीपर गाणी गायली.

Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.