rajkiyalive

sangli congress : काँग्रेस घेणार जयश्री पाटलांचे निलंबन मागे महापालिकेच्या पार्श्वभूमीवर ‘विश्वविशाल’कडून मनधरणी

sangli congress : काँग्रेस घेणार जयश्री पाटलांचे निलंबन मागे महापालिकेच्या पार्श्वभूमीवर ‘विश्वविशाल’कडून मनधरणी : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी काँग्रेसची बांधणी करण्यासाठी काँग्रेसचे जिल्हा नेते आ. विश्वजीत कदम व खा. विशाल पाटील यांनी बेरजेचे राजकारण सुरू केले आहे. विधानसभा निवडणुकीत बंडखोरी केलेल्या जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या उपाध्यक्षा जयश्री पाटील यांची मनधरणी सुरू आहे. त्यांचे निलंबित मागे घेण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. या संदर्भात नुकतीच कडेगाव येथे काँग्रेसची बैठक पार पडली.

sangli congress : काँग्रेस घेणार जयश्री पाटलांचे निलंबन मागे महापालिकेच्या पार्श्वभूमीवर ‘विश्वविशाल’कडून मनधरणी

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तीन-चार महिन्यात होऊ शकतात. त्यामुळे जिल्ह्यात काँग्रेस मजबूत करण्यासाठी आ. विश्वजीत कदम व खा. विशाल पाटील यांच्याकडून प्रयत्न सुरू झाले आहेत. पक्षापासून दुरावलेल्या लोकांना पुन्हा पक्षाच्या प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. सांगली विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसची उमेदवारी न मिळाल्याने जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या उपाध्यक्षा जयश्री पाटील यांनी बंडखोरी केली होती.

यावेळी काँग्रेसचे खा. विशाल पाटील यांच्यासह अनेक पदाधिकारी व माजी नगरसेवक जयश्री पाटील यांच्या प्रचारात होते. जयश्री पाटील यांना पक्षातून निलंबित करण्याची कारवाई प्रदेश काँग्रेसकडून झाली होती. त्यानंतर त्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार अशी चर्चा होती.

महापालिका क्षेत्रात मदनभाऊ गटाची ताकद मोठी आहे. शिवाय मिरजपूर्व भागात देखील मदनभाऊ पाटील यांना माननारा गट आहे. त्यामुळे जयश्री पाटील यांना पुन्हा काँग्रेसच्या प्रवाहात आणण्यासाठी आ. विश्वजीत कदम व खा. विशाल पाटील यांच्याकडून प्रयत्न सुरू आहेत. या संदर्भात जयश्री पाटील यांच्याशी चर्चा देखील करण्यात आली. यावेळी मदनभाऊ समर्थक नगरसेवक व पक्षाचे पदाधिकारी देखील उपस्थित होते.

महापालिका निवडणूक काँग्रेस पक्ष ताकदीने लढेल. 2013 प्रमाणे या निवडणुकीत देखील काँग्रेसची सत्ता आणू. शिवाय जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुका देखील ताकदीने लढू, असे आ. विश्वजीत कदम यांनी यावेळी सांगितले. खा. विशाल पाटील यांनी देखील जयश्री पाटील यांची समजूत काढली.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज