jayant patil news : जयंत पाटील यांच्या संकल्पनेतील मॉडेल स्कूलचा राज्यासाठी मसुदा : राज्यात आदर्श ठरलेल्या सांगली जिल्ह्याच्या मॉडेल स्कूल पॅटर्नची दखल शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी घेतली. त्याबाबतचा मसुदा तयार करण्याचे आदेश दिले आहेत. याबाबत शिक्षणाधिकारी मोहन गायकवाड यांच्याकडून समक्ष या योजनेची माहिती घेतली.
jayant patil news : जयंत पाटील यांच्या संकल्पनेतील मॉडेल स्कूलचा राज्यासाठी मसुदा
शिक्षणमंत्री दादा भुसेंनी घेतली पुन्हा माहिती
जिल्ह्याचे तत्कालीन पालकमंत्री जयंत पाटील यांच्या संकल्पनेतून पुढे आलेली मॉडेल स्कूल योजना युती शासनाच्याही पसंत पडली. त्यामुळे राज्यभरातील जिल्ह्यांमध्ये राबविण्यात येणार आहे. सांगलीतील मॉडेल स्कूलची पुरेशी कल्पना अन्य जिल्ह्यांना नाही. विदर्भ-मराठवाड्यातील काही शाळांतील शिक्षकांनी सांगलीत येऊन मॉडेल स्कूलची पाहणी केली आहे, पण त्यातून त्यांचा पुरेसा अभ्यास झालेला नाही. त्यामुळे मॉडेल स्कूल संकल्पना राज्यभरात राबविण्यासाठी शासन अध्यादेश काढण्यात येणार आहे.

भौतिक सुविधा, शैक्षणिक गुणवत्ता व लोकसहभाग या त्रिसूत्रीवर आधारीत ही संकल्पना आहे. आठवीपर्यंत गुणवत्ता शोध परीक्षा, जिल्हा परिषदेचे चाचणी प्रश्नसंच, क्रीडा व शैक्षणिक साहित्याची निर्मिती कार्यशाळा, पट वाढवा उपक्रम, शैक्षणिक दिनदर्शिका, मेळावे, डिजिटल क्लासरूम, सायकल बँक, रोबोटिक्स व कोडिंग लॅब, सायन्स पार्क आणि बालोद्यान, परसबाग, सोलर पॅनल, संगणक व विज्ञान प्रयोगशाळा, ग्रंथालयाचा समावेश आहे.
चला सावली पेरूया, माझ्या गावचा धडा असे अनेक उपक्रमही राबविण्यात येतात. मॉडेल स्कूलबाबतची मार्गदर्शक तत्वे राज्यातील शाळांना अध्यादेशातून मिळणार आहेत. त्यानंतर सांगली पॅटर्न खर्या अर्थाने राबविण्यास सुरुवात होईल


Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.



