sangli congress news : सांगली मतदारसंघात बंडखोरी करणाऱ्या उमेदवारास काँग्रेसने परत पक्षात घेऊ नये: सांगली : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे नवनिचि नवनिर्वाचित अध्यक्ष श्री हर्षवर्धन सपकाळ यांनी यांनी राज्यातील सर्व जिल्हाध्यक्षांची बैठक काल मुंबईत घेतली. यामध्ये ज्या मतदारसंघात काँग्रेस पक्षाच्या अधिकृत उमेदवाराच्या विरोधात बंडखोरी झाली अशा उमेदवारांना त्यांना पक्षाने 6 वर्ष करता निलंबित केले आहे अशांना पक्षात पुन्हा थारा देऊ नये, अशी आग्रही भूमिका सर्वच जिल्हाध्यक्षांनी मांडली.
sangli congress news : सांगली मतदारसंघात बंडखोरी करणाऱ्या उमेदवारास काँग्रेसने परत पक्षात घेऊ नये
पृथ्वीराज पाटील : प्रदेश काँग्रेस कमिटीच्या बैठकीत स्पष्ट
सांगली विधानसभा मतदारसंघाच्या बाबतीत पृथ्वीराज पाटील यांनी श्रीमती जयश्री पाटील यांनी काँग्रेस पक्षाच्या अधिकृत उमेदवाराविरोधात बंडखोरी केली होती आणि ती मुद्दाम भाजपच्या फायद्यासाठी केली होती, त्यामुळे त्यांना पक्षात पुन्हा घेऊ नये, अशी आग्रही त्यांनी बैठकीत मांडली. तसेच काँग्रेस बंडखोर उमेदवाराच्या बाजूने उभे राहिलेले काही माजी नगरसेवक, पदाधिकारी यांच्या निलंबनाच्या कारवाईचा प्रस्ताववावर माजी प्रांताध्यक्षांनी काहीच निर्णय घेतला नाही याबद्दल खेद व्यक्त केला. पक्ष हितासाठी या बंडखोर समर्थकांवर देखील कारवाई लवकर करण्याची मागणी केले. श्रीमती पाटील यांना काँग्रेसमध्ये परत घेण्याच्या प्रयत्नांना या बैठकीत धक्का देण्याचा प्रयत्न पृथ्वीराज पाटील यांनी केला.
काँग्रेसच्या भूमिकेशी प्रतारणा केली त्यांचा पुन्हा सन्मान केला तर काँग्रेस कशी वाढणार ?
ज्यांनी काँग्रेसच्या विचाराशी आणि काँग्रेसचे उमेदवाराशी, काँग्रेसच्या भूमिकेशी प्रतारणा केली त्यांचा पुन्हा सन्मान केला तर काँग्रेस कशी वाढणार असा सवाल देखील त्यांनी केला. हर्षवर्धन सपकाळ यांनी प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर महाराष्ट्रात नव्याने बांधणी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्या दृष्टीने महाराष्ट्रातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची चर्चा करण्यासाठी ही बैठक झाली. पृथ्वीराज पाटील यांनी या बैठकीत विधानसभा निवडणुकीदरम्यानच्या घटनांचा आढावा घेतला.
काँग्रेसच्या बंडखोर उमेदवारांना निलंबित करण्यात आले आहे मात्र त्यांना समर्थन देणाऱ्या माजी नगरसेवक आणि कार्यकर्त्यांवर निलंबनाची कारवाई करावी यासाठी प्रस्ताव दाखल करण्यात आला होता. ती कारवाई का झाली नाही असा सवाल देखील पृथ्वीराज पाटील यांनी उपस्थित केला. त्याबाबत माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हेच खुलासा करू शकतील अशी भूमिका घेत श्री सपकाळ यांनी सावध भूमिका घेतली. तुम्ही काँग्रेसची नव्याने बांधणी करणार असाल तर खंबीरपणे निर्णय घ्यावे लागतील, सांगली बाबत तुम्ही काय करणार आहात, असा प्रश्न थेट त्यांना विचारण्यात आला. त्यावर श्री सपकाळ यांनी सांगलीतील बंडखोर समर्थकांबद्दल कारवाईचा नव्याने प्रस्ताव सादर करावा अशा सूचना दिल्या.
बंडखोर उमेदवारांना पुन्हा काँग्रेसमध्ये घेण्याचे हालचाली कोणत्याही परिस्थितीत होता कामा नयेत,
बंडखोर उमेदवारांना पुन्हा काँग्रेसमध्ये घेण्याचे हालचाली कोणत्याही परिस्थितीत होता कामा नयेत, पक्षासाठी राबणाऱ्या कष्ट करणाऱ्या आणि संघर्ष करून संघटन बांधणाऱ्यांचे खच्चीकरण करू नका. तसे झाल्यास पुन्हा कोणीही पक्ष बांधण्यासाठी प्रयत्न करणार नाही आणि काही ठराविक लोकांची मक्तेदारी तयार होईल अशी भीती देखील श्री पाटील यांनी या बैठकीत व्यक्त केली. प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांनी पक्षाच्या ध्येय धोरणांशी बांधिल राहून याबाबत योग्य निर्णय घेतला जाईल. पक्ष वाढ महत्त्वाचे आहे. पक्षापेक्षा कोणीही मोठा नाही.. त्यामुळे कुणाचीही गय करण्याची भूमिका घेतली जाणार नाही आणि भविष्यात अशा विचारांना थारा देण्याची कॉंग्रेसची भूमिका नसेल, असेही त्यांनी स्पष्ट केल्याचे सांगण्यात आले.

Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.



