dinanath natyagrah mandir sangli : दीनानाथ मंगेशकर नाट्यगृहाला अवकळा; सांगलीला प्रतिक्षा नव्या नाट्यगृहाची : सांगली ही नाट्यपंढरी म्हणून ओळखली जाते, मात्र या शहरात एकही अद्यावत नाट्यगृह नाही. महापालिकेचे असलेले दीनानाथ मंगेशकर नाट्यगृहात महापुराचे पाणी घुसल्यापासून हे नाट्यगृह बंद अवस्थेत आहे. नाटक, लावणी शोसह इतर मोठ्या कलाकरांचे सांस्कृतिक कार्यक्रम या ठिकाणी होत नाहीत. या नाट्यगृहाला आता अवकळा लागली आहे. तर दुसरीकडे महापालिकेने हनुमाननगर येथे अद्यावत नाट्यगृह उभारण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र आरक्षणाच्या घोळात या नाट्यगृहाचे बांधकाम अडकले आहे. त्यामुळे सांगलीकर आता नव्या नाट्यगृहाच्या प्रतिक्षेत आहेत.
dinanath natyagrah mandir sangli : दीनानाथ मंगेशकर नाट्यगृहाला अवकळा; सांगलीला प्रतिक्षा नव्या नाट्यगृहाची
dinanath-natyagrah-mandir-sangli-dinanath-mangeshkar-theatre-sangli-is-waiting-for-a-new-theater
प्रसिद्ध मराठी नाट्यअभिनेते, गायक व संगीतकार असलेले मास्टर दीनानाथ मंगेशकर यांच्या नावाने तत्कालिन नगरपालिकेने या नाट्यगृहाची उभारणी केली होती. आता महापालिकेच्या ताब्यात हे नाट्यगृह आहे. यापूर्वी या नाट्यगृहावर नुतनीकरणाच्या नावाखाली कोट्यवधी रुपये खर्च केले, मात्र नाट्यप्रयोगांसाठी आवश्यक असलेल्या गरजा हे नाट्यगृह पूर्ण करू शकले नाही. महापालिकेवर या नाट्यगृहाच्या कामातून भ्रष्टाचाराचे आरोप झाले. त्यानंतर हे नाट्यगृह पाडून बहुउद्देशीय संकुल व आत्याधुनिक नाट्यगृह उभारणीचा प्रस्ताव काही वर्षापूर्वी सादर झाला होता. त्यावेळी दीनानाथ मंगेशकरांचे पुत्र प्रसिद्ध गायक, संगीतकार हृदयनाथ मंगेशकरांनी या गोष्टीस विरोध दर्शविला. त्यानंतर पुन्हा नाट्यगृहावर कोट्यावधी रूपये खर्च करण्यात आले.
दोन मजली असलेल्या या नाट्यगृहात आठशे खुर्च्याची व्यवस्था आहे.
मोठे स्टेज देखील आहे. पण कोरोना व महापूर या कारणाने हे नाट्यगृह बंद अवस्थेतच आहे. महापुराचे पाणी नाट्यगृहात घुसले आणि स्टेज खराब झाले आहे. खुर्चा देखील मोडल्या आहेत. त्यामुळे नाटक, लावणी शोसह इतर सांस्कृतिक कार्यक्रम देखील बंद झाले आहेत. नाट्यपंढरी म्हणून ओळखल्या जाणार्या सांगलीत वातानुकूलित नाट्यगृह नाही. त्यामुळे मोठे कलाकार आणि त्यांच्या नाटकांचे प्रयोग सादरीकरणास कोणी इच्छूक नसतात, ही वस्तुस्थिती आहे. शेजारील कोल्हापूर, सातारा आणि सोलापूर जिल्ह्यात वातानुकूलित नाट्यगृहे आहेत. मात्र नाट्यपंढरी सांगलीत वातानुकूलित नाट्यगृह नाही. त्यामुळे महापालिकेने हनुमाननगर येथे नव्याने अद्यावत नाट्यगृह उभारण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठविल्याने हे नाट्यगृह सध्या बंद अवस्थेत आहे.
सांगलीचे आमदार सुधीर गाडगीळ यांनी सांगलीत अद्यावत असे नाट्यगृह उभारण्यासाठी प्रयत्न सुरू केले.
हनुमाननगर येथील ऑक्सिडेशन पाँडजवळील जागेत अद्यावत नाट्यगृह उभारण्याचा प्रस्ताव चर्चेला आला. 2023 मध्ये तत्कालिन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाट्यगृहाच्या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली. त्यासाठी 25 कोटींचा निधी देखील मंजूर करण्यात आला. 25 कोटींचे एक आलिशान नाट्यगृह साकारण्यासाठी महापालिकेने पावले उचलली. त्यासाठी नियोजित हनुमाननगर येथील जागेमध्ये मार्किंगचे पूर्ण करण्यात आले. वास्तुविशारद प्रमोद चौगुले यांनी याचा आराखडा तयार केला.
गेल्या वर्षभरापासून हा प्रस्ताव प्रलंबित आहेत.
त्यानुसार राज्य शासनाने निधी देखील वर्ग केला. या नाट्यगृहाचा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाकडे अंतिम मान्यतेसाठी पाठविण्यात आला. मात्र गेल्या वर्षभरापासून हा प्रस्ताव प्रलंबित आहेत. हनुमाननगर येथील नियोजित नाट्यगृहाच्या जागेवर स्पोर्ट्स कॉम्पलेक्सचे आरक्षण आहे. त्यामुळे नाट्यगृह या जागेवर उभारता येत नाही. या जागेवरील आरक्षणात बदल होणे आवश्यक आहे. या जागेवरील स्पोर्ट्स कॉम्पलेक्सचे आरक्षण रद्द करून नाट्यगृहाचे आरक्षण करणे आवश्यक आहे. किंवा स्पोर्ट्स कॉम्पलेक्स व नाट्यगृह बांधणे असे शासनाकडून हेडसाठी बदल करणे आवश्यक आहे. यासाठी प्रशासनाने गेल्या नऊ महिन्यापासून राज्य शासनाकडे प्रस्ताव सादर केला होता. मात्र अद्याप याला मान्यता मिळाली नाही. त्यामुळे सांगलीकर नवीन नाट्यगृहाच्या प्रतिक्षेत आहेत.
अद्यावत नाट्यगृहामध्ये काय असणार…
सांगलीत होत असलेले अद्यावत नाट्यगृह हे 750 आसन क्षमतेने असून पूर्णपणे वातानुकूलित आहे. याबरोबर कॅफेटेरिया, फूड झोन, प्रशस्त पार्किंग, खुले थिएटर, कॅम्पस गार्डन, कलाकारांना राहण्यासाठी 6 खोल्या, ग्रीन रूम, मेकअप रूम, प्रोजेक्शन आणि चित्रपट सुविधा असणार आहेत. तसेच नाट्यगृह परिसरात आद्य नाटककार विष्णुदास भावे, नाट्याचार्य गोविंद बल्लाळ देवल, नटश्रेष्ठ बालगंधर्व, कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर यांचे पुतळे उभारले जाणार आहेत.

Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.



