sangli bank news : सांगली जिल्हा बँकेतील बंद खात्यातील 50 कोटी रिझर्व्ह बँकेकडे वर्ग : जिल्हा मध्यवर्ती बँकेमधील मागील दहा वर्षापासून बंद असलेल्या जिल्ह्यातील 217 शाखांमधील 1 लाख 91 हजारावर खातेदारांचे सुमारे 50 कोटी रुपयांची रक्कम रिझर्व्ह बँकेकडे जमा करण्यात आली आहे. संबधित खातेदारांनी अवश्यक ती कागदपत्रे दिल्यास जिल्हा बँक खातेदारांना रक्कम परत करणार असल्याचे बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजीराव वाघ यांनी सांगितले.
sangli bank news : सांगली जिल्हा बँकेतील बंद खात्यातील 50 कोटी रिझर्व्ह बँकेकडे वर्ग
1 लाख 91 हजार खातेदारांचे खाते दहा वर्षापासून बंद
रिझर्व्ह बँकेच्या नियमानुसार एखाद्या बँकेतील खात्यावर सलग दहा वर्षे एकदाही उलाढाल झाली नसेल ते खाते नॉन वर्कीग होते. त्या खात्यावर असलेली शिल्लक रिझर्व्ह बँकेला पाठवावी लागते. जिल्ह्यातील सर्व शाखांतील सुमारे एक लाख 91 हजार 132 खातेदारांची 49 कोटी 49 लाख 27 हजार इतकी रक्कम विविध कारणांनी बंद असलेल्या खात्यांमध्ये होती. ही रक्कम रिझर्व्ह बँकेकडे जमा करण्याबाबत जिल्हा बँकेला सूचना करण्यात आली होती.
पहिल्या टप्यात 75 हजार 759 खातेदारांचे 20 कोटी 45 लाख आद हजार तर दुसर्या टप्यात एक लाख 15 हजार 373 खातेदारांची 29 कोटी चार लाख 19 हजार इतकी खकम रिझर्व्ह बँकेत जमा करण्यात आली आहे. बंद खातेदारांच्या वारसांनी आवश्यक पुरावे असलेली कागदपत्रे आणून त्या खात्यावरील रक्कम काढून देण्याबाबत बँकेने ग्राहकांना कळविले होते. त्याला फारसा प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे एवढ्या मोठ्या संख्येने खातेदाराची रक्कम रिझर्व्ह बँकेकडे जमा करावी लागली होती. संबंधित ग्राहकांनी कागदपत्रांची पूर्तता करुन बंद खात्यातील रक्कम काढून घ्यावी, असे आवाहन जिल्हा बँकेच्यावतीने करण्यात आले.
तर बँक गेलेली रक्कम परत करणार
रिझर्व्ह बँकेच्या नियमानुसार बंद खात्यातील खातेदारांचे पैसे रिझर्व्ह बँकेकडे असले तरी ज्या बंद खात्यावरील पैसे गेले आहेत. त्या खातेदार आणि त्यांच्या वारसानी आवश्यक कागदपत्रे जिल्हा बँकेला दिल्यास त्याची रक्कम त्या खातेदारांना दिली जाईल, असे जिल्हा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजीराव वाघ यांनी सांगितले.

Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.



