विक्रम चव्हाण
Chief Minister Youth Work Trainee : मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी पुन्हा बेरोजगार : विधानसभा निवडणूकीपूर्वी भव्य रोगजार मेळावे आयोजित करत शासनाने मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या माध्यमातून विविध शासकिय, खासगी कार्यालयामध्ये नोकरी मिळालेल्या तरुण-तरुणींच्या नोकर्यांवर आता गंडातर आले आहे. जिल्ह्यात अशा तरुण-तरुणींची संख्या साडे तीन हजारांवर आहे. ेसहा महिन्याचा कालावधी संपल्याने त्यांना नोकरीवरुन पायउतार होण्याची वेळ आली आहे.
Chief Minister Youth Work Trainee : मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी पुन्हा बेरोजगार
नोकर्या गेल्याने नैराश्य ः शासनाचे सोयिस्कररित्या दुर्लक्ष
त्यामुळे तरुण-तरुणीं हतबल झाले आहेत. नोकरी गेल्याच्या मानसिकेमधून त्यांच्यामध्ये नैराश्याचे वातावरण निर्माण झाले आहे. शासनाने सेवेत कायम करावे किंवा अन्य कंत्राटी कर्मचार्यांच्याप्रमाणे शासनाने किमान मुदतवाढ तरी द्यावी अशी अपेक्षा तरुण-तरुणी करत आहेत.
लोकसभा निवडणूकीत राज्यातील महाआघाडी सरकारला अपेक्षित यश मिळाले नाही. त्यामुळे विधानसभा निवडणूकीपूर्वी शासनाने तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात अनेक लाभाच्या योजना राज्यात सुरु केल्या.
महाराष्ट्रभर या योजनेचे भव्य मेळावे घेण्यात आले.
मागेल त्या समाजाला महामंडळ, लाडकी बहिण यासह तरुण-तरुणींना रोजगार, नोकर्या मिळाव्यात या उद्देशाने मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना आणली. महाराष्ट्रभर या योजनेचे भव्य मेळावे घेण्यात आले. तरुण-तरुणींना नोकर्यांची आशा दाखविण्यात आली. यासाठी झाडून सारी शासकिय यंत्रणा कार्यन्वित करण्यात आली होती. बाराबी शिक्षण झालेल्यांना 6 हजार, आयटीआय 8 हजार तर पदवी, पदव्युत्तर शिक्षणार्थींना 10 हजार रुपयांचे वेतन देणारी ही योजना बेरोजगार तरुण-तरुणींच्यासाठी आता चेष्ठेचा विषय ठरली आहे.
निवडणूकीपूर्वी या योजनेच्या माध्यमातून शासकिय, खासगी कार्यालयामध्ये नोकरी मिळालेल्या तरुण-तरुणींच्या याच नोकर्यांवर गंडातर आले आहे. सांगली जिल्ह्यात या योजनेच्या माध्यमातून नोकर्या मिळालेल्या तरुण-तरुणींची संख्या 3 हजार 380 इतकी आहेे.
यामध्ये शासकिय नोकर्यांमध्ये कार्यरत असणार्या तरुण-तरुणींची संख्या 2 हजार 169 तर खासगी कंपन्यांमध्ये 1 हजार 211 तरुण-तरुणींचा समावेश होता. वेळेना का होईना नोकरी मिळाली होती. रोजीरोटीचा प्रश्न सुटला होता. त्यामुळे नोकर्या मिळालेल्या तरुण-तरुणींच्यामध्ये आनंदाचे वातावरण होते. विधानसभा निवडणूकीत महाविकास आघाडी सरकारला याचा जबरदस्त पायदा झाला. लाडकी बहिण योजनेप्रमाणे ही योजनाही लोकप्रिय झाली. पण आता निवडणूकीनंतर याच युवांचा पुरत हिरमोड झाला आहे. ही योजना केवळ सहा महिन्यांसाठी होती.
chief-minister-youth-work-trainee-chief-minister-youth-work-trainee-chief-minister-youth-work-trainee-unemployed-again
त्यामुळे शासकिय कार्यालयात काम करणार्या तरुण-तरुणींच्या नोकर्यांवर गंडातर आले आहे. ज्यांचा सहा महिन्याचा कालावधी पूर्ण होत आहे, त्यांना सेवेतून कमी करण्यात येत असल्याने तरुण-तरुणींच्यामध्ये प्रचंड नैराश्य निर्माण झाले आहे. या तरुण-तरुणींना वेतनाच्या अतिरिक्त केवळ अनुभव प्रमाणपत्र देण्यात येते. त्या प्रमाणपत्रही कुचकामी ठरणार आहे. शासकिय भरतीच नसल्याने प्रमाणपत्र घेऊन करायचे काय असा यक्ष प्रश्न या योजनेंतर्गत कार्यरत असलेल्या तरुण-तरुणींच्या समोर उभा ठाकला आहे.
आमदार पडळकर लढाईत उतरणार का?
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी योजनेंतर्गत नोकरी मिळालेल्या युवांची जिल्ह्यातील संख्या साडे तीन हजारांच्या आसपास आहे. परंतू राज्याचा विचार केल्यास ती सव्वा लाखांच्यावर आहे. या सर्वच युवांनी आता नोकर्यांमध्ये कायम करा अशी मागणी लावून धरली आहे. पण असंवेदनशील सरकारने आता याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यास सुरवात केली आहे. ही मागणी सरकारला मान्य करता येत नसेल तर या कर्मचार्यांना कंत्राटी कर्मचार्यांचा दर्जा देत मुदतवाढ द्यावी अशी मागणीही जोर धरु लागली आहे. पण सक्षम नेतृत्वाअभावी शासनदरबारी ही मागणी आवश्यत त्या तीव्रतने पोहचत नसल्याचे चित्र आहे. निवडणूकीपूर्वी एमपीएससीच्या विद्यार्थ्यांसाठी भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी आंदोलन केले होते. ते आमदार पडळकर मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थींसाठी मैदानात उतरणार का असा सवाल उपस्थित केला जात आहे.
युवा कार्य प्रशिक्षणार्थींची संख्या 3380
शासकिय कार्यालयात कार्यरत संख्या 2669
खासगी कंपन्यामध्ये कार्यरत संख्या 1211
शासकिय कार्यालये संख्या 130
खासगी कंपन्या कार्यालय 66

Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.



