rajkiyalive

shirol murdar news : धरणगुत्तीमध्ये अनैतिक संबंधास अडसर ठरणार्‍या पतीचा प्रियकराच्या मदतीने खून

shirol murdar news : धरणगुत्तीमध्ये अनैतिक संबंधास अडसर ठरणार्‍या पतीचा प्रियकराच्या मदतीने खून  धरणगुत्ती (ता.शिरोळ) येथे अनैतिक संबंधात पती अडसर ठरत असल्याने पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीचा खून करून स्मशानभूमीत पुरल्याची धक्कादायक घटना बुधवारी दुपारी उघडकीस आली. संजय अल्लाबक्ष शिकलगार (वय 38 मूळ रा.यादवनगर जयसिंगपूर, सद्या रा.लक्ष्मीनगर धरणगुत्ती) यांचा कोयत्याने सपासप डोक्यात व मानेवर वार करून खून केल्याची घटना गुरुवार (दि.27 फेब्रुवारी) रोजी लिंगायत स्मशानभुमीजवळ रात्री घडली होती.

shirol murdar news : धरणगुत्तीमध्ये अनैतिक संबंधास अडसर ठरणार्‍या पतीचा प्रियकराच्या मदतीने खून

त्यानंतर लगेच धरणगुत्ती येथील लिंगायत स्मशानभूमीत हा मृतदेह पुरण्यात आला होता. बुधवारी सकाळी शिरोळ पोलिसांनी संयिताना ताब्यात घेवून खुनाची माहिती घेतल्यानंतर संशयिताना घटनास्थळी घेवून पुरण्यात आलेला मृतदेह बुधवारी सायकांळी सहाच्या सुमारास बाहेर काढण्यात आला.

या सर्व धक्कादायक घटनेने शिरोळ तालुक्यासह जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.

या खुन प्रकरणी पत्नी दिपा संजय शिकलगार (वय 35 रा.लक्ष्मीनगर धरणगुत्ती), प्रियकर दर्शन भगवान कांबळे (वय 36), प्रियकर यांचा भाऊ अमृत भगवान कांबळे व प्रियकर यांचा चुलता स्वागत वियज कांबळे (तिघे रा.धरणगुत्ती ता.शिरोळ) यांच्याविरोधात शिरोळ पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत शिरोळ पोलिसांतून व घटनास्थळांवरून मिळालेली माहिती अशी, संजय शिकलगार हे गेल्या दिड वर्षापासून गोवा राज्यात गवंडी काम करतात. बुधवार (दि.26) फेबु्रवारी रोजी संजय हे गोव्यावरून जयसिंगपूर येथे आले होते. गेल्या काही दिवसापासून पत्नी दिपा व दर्शन यांच्यात अनैतिक संबंध होते. यावरून पती-पत्नीमध्ये सातत्याने वाद सुरू होता. मात्र पती संजय हा अनैतिक संबंधात अडसर येत असल्याने पत्नी व प्रियकर यांने संजय याचा काटा काढण्याचा डाव रचला होता.

shirol-murdar-newsin-dharnagutti-the-husband-was-killed-with-the-help-of-his-lover-who-was-an-obstacle-to-an-immoral-relationship

यातूनच गुरुवार (दि.27) रोजी रात्री संजय शिकलगार यांना घरातून पत्नी दिपा शिकलगार आणि प्रियकर दर्शन भगवान कांबळे व त्याचा भाऊ व चुलता यांनी त्याला धरणगुत्ती येथील माळभागावर असलेल्या पाण्याच्या टाकीच्या परिसरातील लिंगायत स्मशानभूमीजवळ आणले. त्यानंतर स्मशानभूमीच्या परिसरात कोयत्याने संजय यांच्या डोक्यात आणि मानेवर सपासप अनेक वार करून खून केला.

दुसरीकडे शिरोळ पोलिस ठाण्यात संजय शिकलगार हे गुरुवार (दि.27) रोजी रात्रीपासून बेपत्ता असल्याची फिर्याद मंगळवारी अनिल शिकलगार यांनी दिली होती. अशातच संजय शिकलगार यांच्या नातेवाईकांनी या खुनाच्या प्रकरणाची सखोल माहिती घेऊन शिरोळ पोलिस ठाण्यात धाव घेतली आणि खून झाला असल्याचा संशय व्यक्त केला होता. त्यानंतर शिरोळ पोलिस व स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकांनी तपासाची चक्रे फिरवित पत्नी दिपा, प्रियकर दर्शन कांबळे यांचा भाऊ व चुलत्याला ताब्यात घेतल्यानंतर खुनाची घटना उघडकीस आली.

शिरोळ ठाण्याचे पोलिस निरिक्षक शिवाजीराव गायकवाड व कर्मचार्यांनी प्रियकर दर्शन कांबळे यास धरणगुत्ती येथील लिंगायत स्मशानभूमीत घेवून आले. मृतदेह पुरलेल्या जागेची निश्चिती झाल्यानंतर तहसिलदार अनिलकुमार हेळकर यांच्या उपस्थितीच ग्रामपंचायत कर्मचार्यांनी पुरण्यात आलेला मृतदेह पुन्हा उकरून बाहेर काढला. त्यानंतर मृतदेह हा सडलेल्या अवस्थेत आढळून आला. शिरोळ ग्रामीण रुग्णालयाच्या पथकाने घटनास्थळीच शवविच्छेदन केले. मृत संजय यांच्या मागे तीन मुले, आई, भाऊ असा परीवार आहे.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज