जयंत पाटलांचा गोपीचंद पडळकरांवर पलटवार
jayant patil on padalkar : ‘भुंकणारे भूंकतच राहतात, आपण आपल्या चालीनं’ : सांगली : भारतीय जनता पक्षाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यावर अत्यंत कठोर शब्दांत टीकेची तोफ डागली होती. सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या चौकशीच्या मागणीच्या निमित्ताने पडळकरांनी जयंत पाटील यांची साखर कारखाने खरेदी काढत निशाणा साधला होता. त्यावर माजी मंत्री जयंत पाटील यांनी पलटवार करताना ‘एखाद्याने भुंकायचेच ठरवले असेल तर तो भुंकत राहतो. आपण आपल्या चालीने चालायचं असतं’ या शब्दांत हल्लाबोल केला आहे.
jayant patil on padalkar : ‘भुंकणारे भूंकतच राहतात, आपण आपल्या चालीनं’
सांगली जिल्ह्याच्या राजकारणात भाजपचे गोपीचंद पडळकर आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे जयंत पाटील यांच्यात नेहमी कलगीतुरा रंगलेला असतो. पडळकरांकडून थेट नाव घेऊन पाटील यांच्यावर हल्ला चढवला जातो. मात्र, जयंत पाटील हे नाव न घेता शाब्दीक जोडे हाणण्यात पटाईत आहेत, त्यामुळे जयंतराव आपल्या शैलीने पडळकरांचा समाचार घेत असतात.
jayant-patil-on-padalkar-those-who-bark-will-keep-barking-we-will-follow-our-own-path
जयंत पाटील म्हणाले, टीका केली असेल तर ठीक आहे, त्याच्यावर मी काही बोलत नाही, त्याने मला काही फरक पडत नाही. आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलेल्या आरोपाची चौकशी होईल ना. करू द्या ना. चौकशीला कोणी घाबरतंय की काय? असं उलट आव्हान जयंत पाटील यांनी दिले आहे.
सांगली जिल्हा सहकारी बँकेच्या माध्यमातून मला अडकवण्याचा प्रयत्न होत आहे, असं काही वाटत नाही. एखाद्याची बालबुद्धी असते, तो असं काही विचारत असतो. एखाद्यानं भुंकायचंच ठरवलं आणि तो भुंकतच राहिला तर त्याच्या भुंकण्याकडे बघितलंच पाहिजे, असं काही नाही. आपण आपल्या चालीने चालायचं असतं. भुंकणारे असे अनेक असतात, असा टोलाही जयंत पाटील यांनी गोपीचंद पडळकर यांना लगावला.

Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.



