jain mahamandal news : अर्थसंकल्पात जैन महामंडळाला ठेंगा, रूपयाचा निधी नाही : महाराष्ट्र सरकारचे अर्थसंकल्प अर्थमंत्री अजित पवार यांनी सोमवारी सादर केला. या अर्थसंकल्पान नव्याने स्थापन केलेल्या जैन अल्पसंख्यांक महामंडळासाठी निधीची घोषणा होईल असे सर्वांना वाटत होते. परंतु महाराष्ट्र सरकारने या महामंडळाला ठेंगा दाखविला आहे. या महामंडळासाठी काहीतरी निधी मिळेल असे वाटत असताना समाजाची निराशा झाली आहे.
jain mahamandal news : अर्थसंकल्पात जैन महामंडळाला ठेंगा, रूपयाचा निधी नाही
अर्थसंकल्पात उपमुख्यमंत्री अजित पवारांनी जैन महामंडळासाठी स्वतंत्रपणे कोणतेही घोषणा केली नाही. तथापि बौध्द, जैन, शीख, पारशी, ख्रिश्चन, यहुदी आणि मुस्लीम या अल्पसंख्याक समुदायाच्या विकासासाठी अल्पसंख्यांक संशोधन व प्रशिक्षण संस्था स्थापन करण्याची घोषणा केली आहे. या संस्थेसाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात येईल, असे त्यांनी सांगितले आहे.
जैन महामंडळाची स्थापना केवळ नावापुरतेच
महाराष्ट्र सरकारने जैन अल्पसंख्यांक महामंडळाची स्थापना करून त्याच्या अध्यक्षपदी कोल्हापूरच्या ललीत गांधी यांची निवड केली आहे. महामंडळाच्या माध्यमातून अल्पसंख्यांक असलेल्या जैन समाजाला मोठे लाभ मिळवून देण्याचे आश्वासन ललित गांधी यांनी दिले होते. परंतु आता महामंडळासाठी रूपयाचा निधी न दिल्याने महामंड ळाचे पुढे काय होणार असा प्रश्न पडला आहे. ललीत गांधी यांनी गडबडीने महामंडळाचे कार्यालयही दुसर्याच्या कार्यालयात सुरू आहे. त्यामुळे जैन महामंडळाची स्थापना केवळ नावापुरतेच झाले की काय असे प्रश्न विचारले जावू लागले आहेत. सांगलीतील या कार्यालयात केवळ नवीन बोर्ड तेवढेच दिसत आहे.
jain-mahamandal-news-jain-mahamandal-gets-a-cut-in-the-budget-no-funds-of-rs
सांगलीत मौलाना आझाद महामंडळाचे कार्यालय आहे. या कार्यालयाची धूळ कधी झाडली आहे हे माहित नाही एवढी अस्वच्छता तेथे आहे. तीन कामगारांवर हे कार्यालय सुरू आहे. मौलाना आझादच्या कर्मचार्यांवरच जैन महामंडळचे काम सुरू आहे. तेथे माहिती घेतली असता अजून आम्हाला कोणतेच आदेश आले नाहीत. पूर्वीपासूनच जैन समाजाचे काम मौलाना आझाद या महामंडळामार्फतच चालते अजूनही तेच सुरू आहे.
जैन महामंडळ स्थापन करावे अशी अनेक वर्षापासून अनेकांनी सरकारकडे केली होती. त्यामुळे सरकारचे याचा विचार करून जैन अल्पसंख्याक महामंडळाची स्थापना केली. त्याच्या अध्यक्षपदी ललित गांधी यांची निवडही केली. त्याच्यासोबत इतर सदस्यांची निवड केली आहे. ललित गांधी यांनी मोठ्या उत्साहाने अध्यक्षपदाची ध्ाुरा हाती घेवून राज्यभर दौरा सुरू केला आहे.
राज्य सरकारचे बजेटमध्येही काहीही तरतूद न केल्याने आता ललीत गांधी आणि त्यांचे संचालक मंडळ काय करणार, समाजासाठी काय नवीन आणणार असा प्रश्न पडला आहे.

Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.



