ladki bahin yojna : लाडक्या बहिणींना एप्रिलमध्येही 1500 रूपयेच मिळणार 2100 रुपये कधीपासून ते नंतर सांगणार : मुख्यमंत्री : मुंबई : लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधीपासून मिळणार हे नक्की सांगता येत नाही. परंतु आम्ही ज्यावेळी ते जाहीर करून त्याच्या पुढच्या महिन्यापासून लाडक्या बहिणींना 2100 रूपये मिळतील. तसेच एप्रिल महिन्यातही 1500 रूपयेच मिळणार असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
ladki bahin yojna : लाडक्या बहिणींना एप्रिलमध्येही 1500 रूपयेच मिळणार 2100 रुपये कधीपासून ते नंतर सांगणार : मुख्यमंत्री
फडणवीस म्हणाले, त्यासंदर्भात निश्चितपणे आमचं काम चाललं आहे. एक लक्षात घ्या अर्थसंकल्पाचा समतोल राखणंही महत्त्वाचं आहे. घोषणा दिली आहे, तर ती पूर्ण करायची आहे. सध्या ट्रेंड्स खूप चांगले चालले आहेत. योजना दीर्घकाळ चालवायची असेल तर आपल्याला त्यासाठी आर्थिक तरतुदीही करणं महत्वाचं असतं. समतोल राखत पुढे जायचं आहे, त्यामुळे आम्ही अर्थसंकल्पात जी आश्वासनं दिली आहेत ती पूर्ण करणार. एप्रिल महिन्यात 1500 रुपयेच मिळणार. आम्ही 2100 रुपये कधी मिळणार ते घोषित करु. जेव्हा घोषित करु त्याच्या पुढच्या महिन्यांपासून 2100 रुपये महिलांना मिळण्यास सुरुवात होईल. असं उत्तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
अजित पवार म्हणाले, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेंतर्गत सुमारे 2 कोटी 53 लाख लाभार्थी महिलांना जुलै 2024 पासून आर्थिक लाभ देण्यात येत आहे. त्यासाठी 33 हजार दोन कोटी रुपये खर्च झाला आहे. सन 2025-206 मध्ये या योजनेकरीता एकूण 36 हजार कोटी रुपये नियतव्यय प्रस्तावित आहे.
ladki-bahin-yojna-dear-sisters-will-get-only-rs-1500-in-april-from-when-rs-2100-will-be-announced-later-chief-minister
या योजनेतून मिळणार्या अनुदानाचा उपयोग काही महिला गटांनी आर्थिक उपक्रमासाठी बीज भांडवल म्हणून केला असून अशा गटांना आणखी प्रोत्साहन देण्यासाठी विशेष योजना हाती घेण्याचे विचाराधीन असल्याचं अजित पवारांनी स्पष्ट केलं. दादा, 2100 रुपये कधीपासून देणार असं विचारलं असता अजित पवार म्हणाले जरा थांबा असं म्हणत त्यांनी प्रश्नकर्त्यांना शांत केलं. तसंच आम्ही कुठल्याही घटकाला वंचित ठेवलेलं नाही असंही अजित पवार म्हणाले.
बजेटनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पत्रकार परिषद झाली. या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधीपासून मिळणार? असं विचारण्यात आलं. त्यावर त्यांनी सविस्तर उत्तर दिलं आहे.

Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.