jayant patil on budjet : अर्थसंकल्प म्हणजे बडा घर, पोकळ वासा जयंत पाटील विधानसभेत आक्रमक : बडा घर आणि पोकळ वासा असे काहीसे अर्थसंकल्पाचे वर्णन करता येईल. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या खजिन्यांमध्ये पेशव्यांना कर्ज देण्याची ताकद होती. महाराष्ट्र राज्याच्या खजिन्याची आज काय अवस्था आहे? आपण महापालिकेला देखील कर्ज देऊ शकत नाही ही आपली परिस्थिती आहे, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांनी लगाविला.
jayant patil on budjet : अर्थसंकल्प म्हणजे बडा घर, पोकळ वासा जयंत पाटील विधानसभेत आक्रमक
एवढी महसुली तूट आहे की, सर्व मंत्र्यांना अजितदादांकडे शरण गेल्याशिवाय गत्यंतर नाही.
आ. जयंत पाटील मंगळवारी विधानसभेत अर्थसंकल्पावरील चर्चेत सहभाग घेतला. यावेळी त्यांनी अर्थसंकल्पाची अक्षरशः चिरफाड केली. आ. जयंंत पाटील म्हणाले, 2020-21 साली सरकारवर 5 हजार 19 कोटी रुपयांचे कर्ज होते. यावर्षी ते 9 लाख 32 हजार कोटी रुपयांपर्यंत पोहोचणार आहे. तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या निर्णयांना दूर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. प्राण जाये, पर वचन ना जाये हे प्रभू श्रीरामाची वृत्ती आहे. मात्र सत्ताधारी पक्षांनी निवडणुकीपूर्वी दिलेली आश्वासने पूर्ण झालेली नाहीत. अर्थव्यवस्था एक ट्रिलियन डॉलरपर्यंत नेण्याचे मुख्यमंत्र्यांचे स्वप्न आहे. त्यासाठी आपला विकास वाढीचा दर 14 – 15 टक्के हवा. सध्या तो केवळ 7.3% वर आहे. स्वप्न कधी पूर्ण होणार? असा सवाल केला.
राज्यात एवढ्या महसुली तुटीचा अर्थसंकल्प कोणीच सादर केला नव्हता. हाही एक विक्रमच म्हणावा लागेल.
45 हजार 891 कोटीची महसुली तूट दादांनी सभागृहासमोर मांडली आहे. रोजगार निर्मितीसाठी, उद्योजकांसाठी, आदिवासी बांधवांसाठी, वृद्धांसाठी काहीच तरतूद या अर्थसंकल्पात नाही. नवीन औद्योगिक धोरणामध्ये स्थानिक स्तरावरील गुंडांकडून उद्योजकांना त्रास होऊ नये यासाठी विशेष तरतूद आपण केली पाहिजे. मराठवाड्यासाठी विशेष अशी काहीच तरतूद केलेली नाही. आरोग्य विभागासाठीची 11 हजार 728 कोटींची गेल्या वर्षीची तरतूद 3 हजार 827 कोटींवर आली. दरडोई उत्पन्नात महाराष्ट्र मागे गेला आहे. जीडीपीतील महाराष्ट्राचे योगदान 2 टक्क्यांनी कमी झालेले आहे. आपण थोडं जागं होण्याची गरज आहे.
राज्याची आर्थिक परिस्थिती पाहता लाडक्या बहिणींना 2100 रुपये मिळतील याची खात्री नाही.
निदान आता सर्व महिलांना कुठलाही निकष न लावता पंधराशे रुपये द्या. त्यांना अपात्र करू नका. त्यांच्या कृपेने तुम्ही निवडून आले आहेत. फक्त कृषी क्षेत्राचा ग्रोथ रेट चांगला आहे. त्यामुळे त्या क्षेत्राला बळ देण्याची गरज आहे. सार्वजनिक बांधकाम विभागासाठी 19 हजार कोटींची तरतूद केली आहे. मात्र 46 हजार कोटींची देणी आहेत. हा प्रचंड विरोधाभास आहे. एवढी महसुली तूट आहे की, सर्व मंत्र्यांना अजितदादांकडे शरण गेल्याशिवाय गत्यंतर नाही. ही काळजी करण्यासारखी बाब असल्याचा टोला आ. जयंत पाटील यांनी लगाविला.

Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.



