rajkiyalive

vishal patil news : मी अपक्षच, मात्र गरज पडल्यास भाजपला पाठींबा ; विशाल पाटील

vishal patil news : मी अपक्षच, मात्र गरज पडल्यास भाजपला पाठींबा ; विशाल पाटील : राज्याचे जेष्ठ नेते व सांगलीचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांना माझ्या कामाची पद्धत आवडली असल्याने त्यांच्याकडून मला भाजप प्रवेशाचे निमंत्रण दिले आहे. मी अपक्ष म्हणून निवडून आल्याने जिल्ह्याच्या विकासासाठी सर्वांनी एकत्रित काम करण्याची आवश्यकता आहे. मी अपक्ष म्हणूनच काम करीत राहिन, मात्र एखाद्या विषयावर गरज पडल्यास भाजपला पाठींबा देवू, असे सुतोवाच खासदार विशाल पाटील यांनी रविवारी पत्रकार परिषदेत दिले. जिल्ह्याच्या दुष्काळी भागाला टंचाईच्या झळा बसत असून उपाययोजनांसाठी सरकारने जादा निधी देण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली.

vishal patil news : मी अपक्षच, मात्र गरज पडल्यास भाजपला पाठींबा ; विशाल पाटील

खासदार पाटील म्हणाले, मी आत्तापर्यंत भाजप प्रवेशाचा विचार केला नव्हता. जिल्ह्याच्या विकासासाठी सर्व पक्षाच्या लोकांनी एकत्रित काम केले पाहिजे. माझ्या कामाची पद्धत भाजपचे जेष्ठ नेते चंद्रकांतदादा पाटील यांना आवडली असेल, असे त्यांच्या ऑफरवरुन वाटतंय. सांगली लोकसभा मतदारसंघातून अपक्ष म्हणून निवडून आलो आहे. त्यामुळे कुठल्याही पक्षात कायद्याने प्रवेश करु शकत नाही. सव्वा चार वर्षाचा काळ अपक्ष म्हणून जाईल. मात्र जर कुठल्याही विषयांत पाठींबा द्यायची गरज निर्माण झाल्यास त्यांना पाठींबा द्यायची तयारी आहे.
धनगर समाज आरक्षणाचा प्रस्तावच नाही

धनगर समाजाला आरक्षण देण्याबाबतचा राज्य सरकारकडून कोणताही प्रस्ताव दिला नसल्याचे लेखी पत्र

जनजाती विभागाचे मंत्री ज्युएल खोरा यांनी दिले आहे. संबंधित विभागाच्या मंत्र्यांकडून मागील 44 वर्षात कुठलाही प्रस्ताव आलेला नाही, असेही त्यांनी कळविले आहे. राज्य सरकारने धनगर समाजाचा एसटीमध्ये समावेश करावा, याबाबतचा प्रस्ताव पाठवावा, अशी मागणी खासदार पाटील यांनी केली.

सिंचन योजनांसाठी अतिरिक्त निधीची गरज

जिल्ह्यात उन्हाचा कडावा वाढत आहे. सिंचन योजना सुरु असल्या तरी नियोजन चुकले असल्याचे स्पष्ट झाले, याबाबत जलसंपदा विभागाच्या अधिकार्‍यांना जाब विचारला आहे. लोकांचा अंत पाहू नका, अशा सूचना केल्या आहेत. सिंचन योजनांची रखडलेली कामे मार्गी लावण्याची गरज आहे. पाईपलाईनही अपुरी आहेत. त्यामुळे दुष्काळी भागात पाणी देण्यासाठी राज्य सरकारने अतिरिक्त निधी द्यावा, अशी मागणी त्यांनी केली.

पुराचे पाणी जिल्ह्यातच वळवावे

सांगलीला पूर येवू नये, पुराचे पाणी वळवावे. कृष्णा नदीचे पाणी वळविण्यासाठी केंद्रिय जल आयोगाची मान्यता घ्यावी लागेल. कोयनेच्या पाण्याचा अधिकार कृष्णा खोर्‍याला आहे. हा प्रकल्प कसा सुचविण्यात आला, असा प्रश्न आहे. भीमा-निराऐवजी जिल्ह्यातील पाणी जिल्ह्यातच वळविण्यात यावे, अशी मागणीही खासदार पाटील यांनी केली.

शक्तिपीठला विरोध करण्याचे धोरण नाही

जिल्ह्यात कुठलाही हायवे येत असताना शक्तिपीठला विरोध करण्याचे धोरण माझे नसल्याचे खासदार विशाल पाटील यांनी सांगितले. खानापूर-आटपाडी तालुक्यातून मोठा हायवे जावा, अशी त्या तालुक्यातील शेतकरी, व्यापार्‍यांची आणि खासदार म्हणून माझी इच्छा आहे. जिल्ह्यात शक्तिपीठाला संमिश्र विरोध आहे. ज्याठिकाणी हायवे नाहीत, तेथे घ्यावा. तो खानापूर-आटपाडीतून कराडला जोडावा, तेथून कोल्हापूरला जावू शकतो. दुसरा पर्याय खानापुरातून रत्नागिरी-नागपूर रोडला जोडावा. म्हणजे नदीकाठच्या गावांना त्रास होणार नाही. नदीकाठच्या जमिनीचे अधिग्रहण चुकीचे असल्याचेही त्यांनी सांगितले.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज