सांगली : मिरज तालुक्यातील रसूलवाडी ते मिरज जाणार्या मार्गावरील गतिरोधकावरून भरधाव दुचाकी उडून पडल्याने दुचाकीस्वाराचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. फरदीन मुनाफ जमादार (वय 22 रा. नांदे) असे मयत झालेल्या चालकाचे नाव आहे. सदरचा अपघात हा बुधवार दि. 19 मार्च रोजी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास झाला. या प्रकरणी शहाबाज शमशुद्दीन जमादार (वय 25 रा. नांद्रे) याने सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
sangli crime news : गतिरोधकावरून उडून पडल्याने नांद्रेच्या युवकाचा मृत्यू
याबाबत अधिक माहिती अशी कि, मृत फरदीन जमादार हा आपल्या कुटुंबियांसह मिरज तालुक्यातील नांद्रे गावामध्ये राहत होता. त्याचा सेंट्रिंगचा व्यवसाय होता. बुधवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास जमादार हा त्याच्या मिस्त्री सोबर मोटारसायकल (क्र. एमएच 10 बीपी 5075) वरून रसूलवाडी ते मिरज जाणार्या मार्गावरून निघाला होता.
यावेळी सुलतान नसरुद्दीन चिराग दिल्ली दर्ग्याजवळ त्याची मोटारसायकल आली असता भरधाव दुचाकी हि याठिकाणी असणार्या गतिरोधकावरून गेली. यावेळी चालक फरदीन जमादार हा रस्त्यावर आपटल्याने त्याच्या डोक्याला, छातीला आणि खांद्याला गंभीर दुखापत झाली. अपघातानंतर त्याला तातडीने उपचारासाठी सांगलीतील शासकीय रुग्णालयात दाखल केले. याठिकाणी उपचार सुरु असतानाच त्याचा मृत्यू झाला. या अपघाताची नोंद सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात झाली आहे.

Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.



