sangliwadi news : सांगलीवाडी जयंत बैलगाडी मैदान हेलिकॉप्टर बैज्याने मारले… : महालक्ष्मी मंदिर यात्रेनिमित्त सांगलीवाडी येथे झालेल्या जयंत बैलगाडी जनरल शर्यतीमध्ये शिरुरच्या बाळू हजारे यांच्या ‘हेलिकॉप्टर-बैजा’ बैलजोडीने प्रथम क्रमांकाचे सव्वालाख रुपयांचे बक्षीस मिळवले. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांच्या हस्ते प्रथम क्रमांकाचे 1 लाख 25 हजाराचे रोख बक्षिस व ढाल देण्यात आली.
sangliwadi news : सांगलीवाडी जयंत बैलगाडी मैदान हेलिकॉप्टर बैज्याने मारले…
सांगलीवाडीतील लक्ष्मी फाटाजवळील मिटारकी पट्टा येथे विना लाठीकाठी, मोटारसायकल मानाची जयंत बैलगाडा शर्यतीचे पार पडल्या. शर्यंतीचे उद्घाटन शिवप्रतिष्ठानचे संभाजीराव भिडे यांच्याहस्ते झाले. तर प्रमुख पाहुणे म्हणून आ. जयंत पाटील उपस्थित होते. यावेळी शिवप्रतिष्ठानचे राष्ट्रीय अध्यक्ष रावसाहेब देसाई, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज, युवकचे शहर जिल्हाध्यक्ष राहुल पवार, मुख्य संयोजक अभिजीत कोळी, सांगली शहर अध्यक्ष सागर घोडके, जयराज पाटील, सचिन जगदाळे, हरिदास पाटील आदी उपस्थित होते. सांगलीवाडी येथील बैलगाडी शर्यंत पाहण्यासाठी सांगलीसह कोल्हापूर, सातारा, कर्नाटक सीमाभागातून बैलगाडीप्रेमींनी मोठी हजेरी लावली होती.
जनरल ‘अ’ गट बैलगाडी शर्यतीसाठी दुसरा क्रमांक हरिपूर येथील महेश बोद्रे-सरकार यांच्या बैलजोडीने मिळवला. त्यांना 1 लाखाचे बक्षिस देण्यात आले. तिसर्या क्रमांकाचे 75 हजार बक्षिस दानोळीच्या अमर शिंदे यांच्या बैलजोडीने मिळवला. जनरल ब गट बैलगाडी शर्यंतीत प्रथम क्रमांक रणदीप थोरात (31 हजार), दादा पैलवान (सिध्देवाडी- 21 हजार), नामदेव बापू सांगली (15 हजार) बक्षिसे दिली. ‘ब’ गटात प्रथम अक्षय तामगावे (कवठेपिरान, 15 हजार), दुसरा क्रमांक संजू पाटील ( सांगलीवाडी- 11 हजार) तर तिसरा क्रमांक अनिल मगदूम (7 हजार) रुपये बक्षिस पटकावले. आदत बैलगाडी शर्यंतीत अनुक्रमे शरद वाघमोडे, बापू चौगुले, चेतन सरवदे यांच्या बैलजोडीने बक्षिसे पटकावली.
sangliwadi-news-sangliwadi-jayant-bullock-cart-maidan-helicopter-hit-by-a-bullock-cart
आमदार जयंत पाटील म्हणाले, पश्चिम महाराष्ट्रातील सर्व बैलगाडी शौकिनांसाठी हे मैदान पर्वणी ठरते आहे. शौकिनाना शर्यंतीचा थरार स्क्रिनवरही पाहता येतो. गेल्या दोन वर्षापेक्षा यंदा शर्यंतीचे नेटके संयोजन केले आहे. मार्गावरील झाडे काढली आहेत. तरुण नेता अभिजित कोळी व त्यांच्या कष्टामुळे मैदान यशस्वी होत आहे. यात्रा समितीचे प्रमुख संयोजक अभिजित कोळी म्हणाले, गेली चार वर्षे शर्यंतीचे आयोजन केले जात असून यासाठी सांगलीवाडीसह शेजारील गावातील तरुणांचे मोठे योगदान आहे.
पंच म्हणून किरण कोळी, तानाजी कोळी, संजय पाटील, बबलू कोळी, संतोष निकम, भानुदास कदम, विनायक सुर्यवंशी, संजय व्हनमाने, सत्यजित फडतरे, विजय पाटील, प्रताप पाटील, सागर पाटील यांनी शर्यंतीचे संयोजन केले.

Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.