rajkiyalive

maharashtra govt.news : आता घरकुलास मिळणार 2.09 लाख रुपये

maharashtra govt.news : आता घरकुलास मिळणार 2.09 लाख रुपये : प्रधानमंत्री आवासच्या घरकुलांसाठी सरकारकडून घरकुल, मनरेगा आणि स्वच्छ भारत या तिन्ही योजनांतून अवघे 1 लाख 48 हजार रुपयांचे अनुदान मिळते. या निधीतून बांधकाम करणे अशक्य होते. आता घरकूल बांधकामासाठी आता लाभार्थींना 50 हजार रुपये वाढीव अनुदान देण्याचा निर्णय राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाने घेतला आहे.

maharashtra govt.news : आता घरकुलास मिळणार 2.09 लाख रुपये

जिल्ह्यातील 32 हजार लाभार्थींना दिलासा, बांधकामासाठी 50 हजाराचे अनुदान वाढले

पूर्वीच्या एक लाख 20 हजार रुपयांच्या अनुदानात 50 हजार रुपयांची वाढ करण्यात आली आहे. त्यातील 15 हजार रुपये घरावर सौरउर्जा यंत्रणा उभारणीसाठी आहेत. त्यामुळे घरकुल मंजूर झालेल्या लाभार्थींना काहीसा दिलासा मिळाला आहे.
प्रधानमंत्री आवास योजनेतून घरकुल मंजूर झालेल्या लाभार्थ्यांना बांधकामास 1 लाख 20 हजार चार टप्प्यात जमा होतात. घरकुलाचे काम पूर्ण करण्यासाठी 90 दिवसांचा कालावधी निश्चित करण्यात आला आहे. परंतु जिल्ह्यातील 5 हजार 365 लाभार्थींनी घरकुल मंजूर झाले असतानाही नाकारले आहे.

सरकारकडून दिल्या जाणार्‍या रकमेत घराचे बांधकाम करता येणार नाही, उर्वरित पैशाची व्यवस्था नसल्याने घरकुल नाकारले आहे, याबाबत संबंधित लाभार्थींनी ग्रामपंचायत आणि जिल्हा परिषद ग्रामीण विकास यंत्रणेला लेखी पत्र दिले आहे. राज्यातील बहुतांशी जिल्ह्यातील हजारो लाभार्थींनी घरकुल नाकारले होते. त्यामुळे घरकुल बांधकामासाठी वाढीव अनुदानाचा निर्णय घेण्यात आला.

प्रत्येक लाभार्थीस मिळणार आता 2.09 लाख रुपये

घरकूल लाभार्थींना आता मूळ अनुदान एक लाख 20 हजार रुपये, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून 90 दिवसांच्या मजुरीपोटी 27 हजार रुपये व स्वच्छ भारत मिशनअंतर्गत शौचालय बांधणीसाठी 12 हजार रुपये दिले जातात. आता ग्रामविकास विभागाच्या निर्णयानुसार 50 हजार रुपये वाढीव मिळणार आहेत. असे प्रत्येक लाभार्थीस आता दोन लाख नऊ हजार रुपये मिळतील. ग्रामविकास विभागाने वाढीव अनुदानाचा शासन निर्णय काढला आहे. राज्य पुरस्कृत ग्रामीण घरकूल योजनेतील लाभार्थींनाही वाढीव अनुदान मिळणार आहे. केंद्र सरकारच्या अनुदानाशिवाय ही राज्य हिस्शातील वाढीव रक्कम असणार आहे. या निर्णयामुळे अपुर्‍या अनुदानामुळे थांबलेली घरकुले पूर्ण होतील, अशी आशा आहे.

मुख्यमंत्र्यांच्या 100 दिवसांच्या कार्यक्रमाअंतर्गत 10 एप्रिलपर्यंत 25 हजार घरकुले बांधून पूर्ण होणे अपेक्षित आहेत. पण, अनुदान कमी, मोफत वाळू मिळत नसल्याने व बांधकाम साहित्य महागल्याने 50 टक्के लाभार्थींची घरे अजूनही अपूर्णच असल्याचे स्पष्ट झाले होते. दरम्यान, जिल्हा दरसुचीनुसार 269 चौरस फूट घरकूल बांधकामासाठी सव्वादोन लाख रुपयांचा खर्च होतो. पूर्वीच्या एक लाख 20 हजार रुपयांच्या अनुदानात 50 हजार रुपयांची वाढ करण्यात आली आहे. त्यातील 15 हजार रुपये घरावर सौरउर्जा यंत्रणा उभारणीसाठी आहेत. त्यामुळे घरकुल मंजूर झालेल्या लाभार्थींना काहीसा दिलासा मिळाला आहे.

घरकूल बांधकामासाठी लाभार्थीस पोलिस व महसूल प्रशासनाने कारवाईत जप्त केलेली वाळू व ज्या ठिकाणी लिलाव सुरू आहेत. तेथील वाळू मोफत देण्याचे शासनाचे धोरण आहे. पण, अजूनही सुधारित वाळू धोरण निश्चित न झाल्याने शेकडो वाळू ठेक्यांचे लिलाव होऊ शकलेले नाहीत. त्याचा देखील घरकुलांच्या कामांवर परिणाम झाला आहे. सर्वसामान्य बेघर लाभार्थींना शासनाच्या त्या सुधारित धोरणाची प्रतिक्षा आहे.

घरकुल मंजूर झालेल्या लाभार्थीना वाढीव अनुदान

घरकूल लाभार्थींना वाढीव 50 हजार रुपये अनुदान देण्याची घोषणा झाली होती, पण शासन निर्णय झालेला नव्हता. आता ग्रामविकास विभागाने त्यासंदर्भातील आदेश काढला आहे, ज्या लाभार्थींना घकुला मंजूर झाले आहे, त्यांना 2 लाख 9 हजार रुपयांचे अनुदान मिळणार असल्याचे जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक नंदिनी घाणेकर यांनी सांगितले.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज