rajkiyalive

chandukaka saraf news : चंदुकाका सराफ ज्वेल्सच्या 12 हजार स्क्वेअर फुटांच्या भव्यदिव्य सांगली शाखेचे 20 रोजी उद्घाटन

chandukaka saraf news : चंदुकाका सराफ ज्वेल्सच्या 12 हजार स्क्वेअर फुटांच्या भव्यदिव्य सांगली शाखेचे 20 रोजी उद्घाटन : गणरायाच्या आशिर्वादाने पावन झालेल्या व कृष्णेच्या पाण्याने सुजलाम-सुफलाम असलेल्या राजेशाही सांगली शहरात, गेली 198 वर्षे शुध्दता, परंपरा आणि विश्वास या त्रिसुत्रीच्या भक्कम पायावर उभ्या राहिलेल्या व निरंतर प्रगती करत असलेल्या चंदुकाका सराफ ज्वेल्स 12 हजार स्क्वेअर फूटांच्या भव्यदिव्य नवीन जागेत स्थलांतरीत होत आहेत . नवीन शाखेचे उद्घाटन रविवार दि. 20 एप्रिल 2025 रोजी सकाळी 11 वाजता संपन्न होत आहे.

chandukaka saraf news : चंदुकाका सराफ ज्वेल्सच्या 12 हजार स्क्वेअर फुटांच्या भव्यदिव्य सांगली शाखेचे 20 रोजी उद्घाटन

उद्घाटननिमित्त सांगलीकरांना मिळणार दागिने खरेदीवर अनेक बक्षिसांचा लाभ

चंदुकाका सराफ ज्वेल्स् यांनी 9 वर्षापूर्वी सांगली शाखेचा शुभारंभ करून सांगलीकरांच्या सेवेत सादर झाले होते. सांगलीकरांनी दाखवलेल्या अतूट विश्वासामुळे व सहकार्यामुळे ते 9 वर्षांचा यशस्वी पल्ला गाठू शकले आहेत.विश्वासाची हीच पंरपरा जपून आजपर्यंत लाखो ग्राहकांनी दिलेल्या विश्वासाला सार्थ ठरवत चंदुकाका सराफ ज्वेल्स् निरंतर वाटचाल करीत आहे.

भव्य दिव्य असणार्या चंदुकाका सराफ ज्वेल्स् यांच्या नूतन जागेतील शाखेचा शुभारंभ विविध मान्यवर व चंदुकाका सराफ ज्वेल्स चे संचालक अतुल जिनदत्त शहा, सौ. संगिता अतुल शहा, श्री. सिध्दार्थ अतुल शहा, श्री. आदित्य अतुल शहा यांच्या उपस्थित येरळा भवन समोर, गेस्ट हाऊस जवळ, सांगली मिरज सर्व्हिस रोड, विश्रामबाग सांगली येथे संपन्न होत आहे.

महाराष्ट्र व कर्नाटक राज्य मिळून चंदुकाका सराफ ज्वेल्स चा कार्यविस्तार झाला असून समृध्द,ऐतिहासिक, सांस्कृतिक, धार्मिक वारसा लाभलेल्या सांगली येथील चंदुकाका सराफ ज्वेल्स्ची ही सोळावी शाखा आहे. . परंपरेची कास न सोडता सतत नाविन्याचा वेध घेणार्या चंदुकाका सराफ ज्वेल्स्च्या सर्वच शाखांमध्ये दोन गोष्टी सारख्या आढळतात एक म्हणजे सोने-चांदीची शुध्दता आणि ग्राहकांशी असलेले ऋणानुबंध व परिणामी त्यांचा कमावलेला अढळ विश्वास.
उदघाटना निमित्त चंदुकाका सराफ ज्वेल्स यांचेवतीने सांगलीकरांसाठी मेगा ड्रॉ ऑफर सादर केली आहे.

यामध्ये रू. 25,000/- च्या पुढील दागिने खरेदीवर मेगा ड्रॉ द्वारे विविध आकर्षक बक्षिसे मिळवण्याची सुवर्णसंधी आहे. यामध्ये 4 रॉयल एनफिल्ड बुलेट, 4 लॅपटॉप, 4 मोबाईल फोन जिंकण्याची संधी आहे.

chandukaka-saraf-news-chandukaka-saraf-jewels-12000-square-feet-grand-sangli-branch-to-be-inaugurated-on-20th

समृध्द आणि सुजलाम-सुफलाम सांगली शहरात नूतन जागेत शुभारंभ करताना आमचा आनंद द्विगुणीत होत असून समस्त सांगलीकरांनी गेली 9 वर्षे आम्हांला दिलेले प्रेम व विश्वासाचे अतूट नाते अजून घट्ट करायचे आहे असा विश्वास चंदुकाका सराफ ज्वेल्स्चे संचालक श्री. अतुल शहा व श्री. सिध्दार्थ शहा यांनी व्यक्त केला आहे. उद्घाटन समारंभास समस्त सांगलीकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद द्यावा असे आवाहन श्री सिध्दार्थ शहा यांनी केले आहे. लवकरच चंदुकाका सराफ ज्वेल्स्च्या वाई व रबकवी (कर्नाटक) शाखांचा शुभारंभ देखील होत आहे.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज