जयंत पाटील यांच्या प्रयत्नाने चांदोली प्रकल्पग्रंस्तांना 4 कोटीचा निधी : माजी मंत्री आ.जयंतराव पाटील व त्यांच्या प्रकल्पग्रस्त कार्यकर्त्यांच्या अथक प्रयत्न व पाठपुराव्यातून चांदोली अभयारण्य प्रकल्पग्रस्तांना मूलभूत सोई-सुविधा पूर्ण करण्यासाठी राज्य शासनाच्या जनवन योजने अंतर्गत 4 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.
जयंत पाटील यांच्या प्रयत्नाने चांदोली प्रकल्पग्रंस्तांना 4 कोटीचा निधी
चांदोली अभयारण्य प्रकल्पग्रस्तांच्या वाळवा, शिराळा व मिरज तालुक्यातील 16 वसाहतींना प्रत्येकी 25 लाख रुपयांचा हा निधी मिळणार आहे. चांदोली अभयारण्य प्रकल्पग्रस्तांच्या मागणी व लढ्याला अखेर यश आल्याने सर्व वसाहतीमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे. ही माहिती चांदोली अभयारण्य प्रकल्पग्रस्त कार्यकर्ते राम सावंत (तुंग) यांनी दिली.
डॉ.श्यामाप्रसाद मुखर्जी जनवन योजने अंतर्गत चांदोली अभयारण्य प्रकल्पग्रस्त वसाहतीमध्ये मूलभूत सोई-सुविधा करण्या साठी हा निधी मिळाला आहे. आ.जयंतराव पाटील व त्यांचे प्रकल्पग्रस्त कार्यकर्ते गेल्या 2-3 वर्षांपासून हा निधी मिळविण्यासाठी प्रयत्न करीत होते.
कुपवाड (सांगली) येथील वनविभाग कार्यालयाकडे हा निधी मिळावा म्हणून लेखी अर्जाद्वारे मागणी करण्यात आली होती. त्याप्रमाणे सर्व वसाहतीमध्ये जन वन योजना समित्या स्थापन करून त्यांच्या मार्फत वन विभागाकडे प्रस्ताव सादर करण्यात आले होते. या प्रस्तावामध्ये काही अडचणी व त्रुटी आल्या होत्या,त्या सर्व पूर्ण करण्यात आल्या.
डॉ.श्यामा प्रसाद मुखर्जी जनवन योजनेचे प्रस्ताव मंजूर होऊन त्यास निधी मिळण्या साठी सर्व संबंधित प्रशासकीय विभागांच्या तांत्रिक मंजूरी मिळण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करण्यात आला आहे. गेल्या 8-9 महिन्यांपूर्वी सर्व प्रकल्पग्रस्त वसाहतींचे जन वन योजनेचे प्रस्ताव राज्य शासनाकडे मंजुरी व निधी मिळण्यासाठी पाठविण्यात आले होते.
हा प्रस्ताव मंजूर होऊन त्यास निधी मिळण्यासाठी प्रकल्पग्रस्त कार्यकर्त्यांनी राज्य स्तरावर सातत्याने पाठपुरावा केल्याने चांदीली अभयारण्य प्रकल्पग्रस्त कार्यकर्त्यां च्या मागणी व लढ्याला अखेर यश मिळाले आहे.
jayant-patil-news-jayant-patils-efforts-resulted-in-a-fund-of-rs-4-crore-for-chandoli-project-workers
राम सावंत,ज्ञानदेव पवार,शंकर लोखंडे, दीपक वाघमारे,लक्ष्मण सावंत,मारुती रेवले, बिरु येडगे,सुनिल पाटील,चंद्रकांत सावंत, मिथुन पवार यांच्यासह चांदोली अभयारण्य प्रकल्पग्रस्त कार्यकर्त्यांनी आ.जयंतराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा निधी मिळण्यासाठी मोठे परिश्रम घेतले आहेत. सर्व कार्यकर्त्यांनी आ.जयंतराव पाटील यांची भेट घेऊन त्यांचे आभार मानले

Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.