jain samaj news : 24 एप्रिलला जैन समाजाचा आक्रोश मोर्चा : विलेपार्ले पूर्व मुंबई येथे 32 वर्षापुर्वीपासून असलेले जैन मंदिर तडकाफडकी मुंबई महापालिका प्रशासनाने बुलडोझर लावून जमीनदोस्त केले. या हिंसक व अन्यायी कारवाईने देशातील व महाराष्ट्रातील अहिंसक जैन समाजाच्या भावना दुखावल्या आहेत, या निषेर्धात गुरुवार दि. 24 एप्रिलला जिल्हाधिकारी कार्यालयावर जैन समाजाचा आक्रोश मोर्चा काढण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला.
jain samaj news : 24 एप्रिलला जैन समाजाचा आक्रोश मोर्चा
दक्षिण भारत जैन सभेने आयोजित केलेल्या सकल जैन समाजाच्या बैठकीत मुंबई महापालिका प्रशासनाचा तीव्र शब्दात निषेध करण्यात आला. या बैठकीत सभेचे अध्यक्ष भालचंद्र पाटील होते. बैठकीला चेअरमन रावसाहेब पाटील, मुख्यमहामंत्री डॉ अजित पाटील, खजिनदार संजय शेटे, महामंत्री प्रा. एन.डी.बिरनाळे, डॉ. सी. एन. चौगुले, शशिकांत राजोबा, डी. ए. पाटील, डॉ जयपाल चौगुले, स्वरूपा पाटील (यड्रावकर) आदी उपस्थित होते.
महाराष्ट्र शासनाने मंदिर उध्वस्त केलेल्या महापालिकेचे अधिकारी व कर्मचारी यांचे तातडीने निलंबन करावे व होते त्याच ठिकाणी जैन मंदिर पुनर्निर्माण करावे असा एकमताने ठराव पारित करण्यात आला. तर गुरुवारी सकाळी 9 वाजता विश्रामबाग येथील क्रांतीसिंह नाना पाटील पुतळ्यापासून मोर्चाला प्रारंभ होईल व जिल्हाधिकारी कार्यालयावरसमोर मोर्चाचे सभेत रुपांतर होऊन जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्याचे ठरले.
यावेळी शीतल मदवांना व रोहन मेहता इत्यादींनी मंदिर पडल्याचे घटनेचा तीव्र शब्दात निषेध केला यापुढे असा अन्याय जैन सामाज्यावर होऊ नये म्हणून कायदेशीर व रस्त्यावरची लढाई जोरदारपणे लढू असे सांगितले.
jain-samaj-news-jain-community-protest-march-on-april-24
या बैठकीला राहुल चौगुले, सुरेश पाटील, महावीर खोत, जतीन शहा, पोपटलाल डोर्ले, जनगोंडा थोटे, बाबासाहेब पाटील, दीपक पाटील, अनिता पाटील, सुरेखा पाटील, चांदणी आरवाडे, पत्रकार पल्लवी पाटील, अजित सकळे, श्रीपाल चौगुले, अजित बिरनाळे, सुहास पाटील आदी उपस्थित होते.

Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.