सांगलीकरांनी दिला उत्स्फूर्त प्रतिसाद
chandukaka saraf news : चंदुकाका सराफ ज्वेल्सच्या भव्यदिव्य सांगली शाखेचा शानदार प्रारंभ : गेली 198 वर्षे शुध्दता, परंपरा आणि विश्वास या त्रिसुत्रीच्या भक्कम पायावर उभ्या राहिलेल्या व निरंतर प्रगती करत असलेल्या चंदुकाका सराफ ज्वेल्स यांच्या सागंली येथील 12 हजार स्क्वेअर फूटांच्या भव्यदिव्य नवीन जागेत स्थलांतरीत झालेल्या नूतन शाखेचा शानदार शुभारंभ सोहळा मोठया थाटात संपन्न झाला. यावेळी समस्त सांगलीकरांनी चंदुकाका सराफ ज्वेल्सला भरभरून प्रतिसाद दिला.
chandukaka saraf news : चंदुकाका सराफ ज्वेल्सच्या भव्यदिव्य सांगली शाखेचा शानदार प्रारंभ
भव्य दिव्य असणार्या चंदुकाका सराफ ज्वेल्स् यांच्या नूतन जागेतील शाखेचा शुभारंभ चंदुकाका सराफ ज्वेल्स चे संचालक श्री. अतुल जिनदत्त शहा, सौ. संगिता अतुल शहा, श्री. सिध्दार्थ अतुल शहा, सौ. अंकिता सिध्दार्थ शहा, श्री. आदित्य अतुल शहा यांच्या उपस्थित येरळा भवन समोर, गेस्ट हाऊस जवळ, सांगली मिरज सर्व्हिस रोड, विश्रामबाग सांगली येथे संपन्न झाला.
यावेळी खासदार विशाल पाटील, माजी खासदार राजू शेट्टी, आमदार सुधीर गाडगीळ, आमदार राजेंद्र पाटील (यड्रावकर), उद्योगपती संजय घोडावत, आमदार अशोकराव माने (बापू), आमदार इद्रीस नायकवडी, श्री. पृथ्वीराज (बाबा) पाटील, नीता केळकर, श्री. भालचंद्र पाटील, श्री. रावसाहेब पाटील, स्वाती शिंदे, सौ. अनघा चितळे, श्री. शशिकांत राजोबा सर, श्री. पृथ्वीराज पवार व अन्य मान्यवरांनी उद्घाटन प्रसंगी शोरूमला भेट देऊन शुभेच्छा दिल्या.
यावेळी बोलताना चंदुकाका सराफ ज्वेल्सचे संचालक अतुल जिनदत्त शहा म्हणाले की, चंदुकाका सराफ ज्वेल्स यांनी 9 वर्षापूर्वी सांगली शाखेचा शुभारंभ करून सांगलीकरांच्या सेवेत सादर झाले होते. सांगलीकरांनी दाखवलेल्या अतूट विश्वासामुळे व सहकार्यामुळे ते 9 वर्षांचा यशस्वी पल्ला गाठू शकले आहेत.विश्वासाची हीच पंरपरा जपून आजपर्यंत लाखो ग्राहकांनी दिलेल्या विश्वासाला सार्थ ठरवत चंदुकाका सराफ ज्वेल्स् निरंतर वाटचाल करीत आहे.
महाराष्ट्र व कर्नाटक राज्य मिळून चंदुकाका सराफ ज्वेल्सचा कार्यविस्तार झाला असून समृध्द,ऐतिहासिक, सांस्कृतिक, धार्मिक वारसा लाभलेल्या सांगली येथील चंदुकाका सराफ ज्वेल्स्ची ही सोळावी शाखा आहे.
chandukaka-saraf-news-the-grand-opening-of-the-magnificent-sangli-branch-of-chandukaka-saraf-jewels
यावेळी मनोगत व्यक्त करताना चंदुकाका सराफ ज्वेल्स चे संचालक सिध्दार्थ शहा म्हणाले की, संपुर्ण पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठे सुवर्ण दालन सांगलीकरांना सादर करताना आम्हांला विशेष आनंद होत आहे. उद्घाटना निमित्त सांगलीकरांसाठी मेगा ड्रॉ ऑफर सादर केली आहे. यामध्ये रू. 25,000/- च्या पुढील दागिने खरेदीवर मेगा ड्रॉ द्वारे विविध आकर्षक बक्षिसे मिळवण्याची सुवर्णसंधी उपलब्ध केली आहे. यामध्ये 4 रॉयल एनफिल्ड बुलेट, 4 लॅपटॉप, 4 मोबाईल फोन जिंकण्याची संधी आहे.
सांगली शहरात नूतन जागेत शुभारंभ करताना आमचा आनंद द्विगुणीत होत असून समस्त सांगलीकरांनी गेली 9 वर्षे आम्हांला दिलेले प्रेम व विश्वासाचे अतूट नाते अजून घट्ट होईल असा आमचा दृढ विश्वास आहे. लवकरच चंदुकाका सराफ ज्वेल्स्च्या वाई व रबकवी (कर्नाटक) शाखांचा शुभारंभ होत असल्याचे श्री. सिध्दार्थ शहा यांनी यावेळी सांगितले.
चंदुकाका सराफ ज्वेल्स यांच्या सांगली शाखेचा शुभारंभ करताना श्री. अतुल जिनदत्त शहा, सौ. संगिता अतुल शहा, श्री. सिध्दार्थ अतुल शहा, सौ. अंकिता सिध्दार्थ शहा, श्री. आदित्य अतुल शहा व अन्य मान्यवर.

Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.