rajkiyalive

ajitdada news : चार माजी आमदारांसह अनेकजण मंगळवारी राष्ट्रवादीत : मुंबईत पक्षप्रवेश सोहळा

ajitdada news : चार माजी आमदारांसह अनेकजण मंगळवारी राष्ट्रवादीत : मुंबईत पक्षप्रवेश सोहळा: मुंबईत पक्षप्रवेश सोहळा : सांगली जिल्ह्यातील माजी मंत्री अजितराव घोरपडे, शिवाजीराव नाईक, माजी आमदार विलासराव जगताप, राजेंद्रअण्णा देशमुख, माजी जिल्हा परिषद सदस्य तम्मणगौडा रवी पाटील, रणधीर नाईक, पलूसचे माजी नगरसेवक निलेश येसुगडे मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत मुंबईत त्यांचा पक्ष प्रवेश होणार आहे. त्यामुळे जिल्ह्यात आता राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद वाढणार आहे.

ajitdada news : चार माजी आमदारांसह अनेकजण मंगळवारी राष्ट्रवादीत : मुंबईत पक्षप्रवेश सोहळा

सांगली जिल्ह्यात पंधरा वर्षांपूर्वी तत्कालिन काँग्रेस व राष्ट्रवादीच्या नेत्यांना शह देण्यासाठी दुष्काळी फोरमच्या नावाखाली जिल्ह्यातील नेत्यांची फौज एकत्र आली होती. यामध्ये माजी आमदार विलासराव जगपात, माजी मंत्री अजितराव घोरपडे, माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख, माजी आमदार पृथ्वीराज देशमुख यांचा समावेश होता. यातील अनेक नेते हे राष्ट्रवादीत होते पण त्यांनी वेगळा गट स्थापन केला होता. भाजपने जिल्ह्यात ताकद वाढविण्यास सुरूवात केल्यानंतर अनेकांनी भाजपमध्ये प्रवेश केला. पण कालांतराने भाजपबरोबर देखील अनेकांनी फारकत घेतली.

लोकसभा व विधानसभा निवडणुकीत माजी आमदार विलासराव जगपात, यांनी भाजपविरोधात भूमीका घेतली. तर माजी मंत्री शिवाजीराव नाईक यांनी महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा प्रचार केला होता. विधानसभेला माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख यांनी राष्ट्रवादी शरद पवार पक्षात प्रवेश केला. पण पवार यांच्या पक्षाकडून उमेदवारी न मिळाल्याने त्यांनी बंडखोरी केली होती. माजी मंत्री अजितराव घोरपडे लोकसभेला भाजपविरोधात तर विधानसभेला राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर होते. आता या नेत्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे.

मंगळवारी महाराष्ट्र क्रिकेट असोशिएशनच्या वानखेडे स्टेडियम डी रोड, चर्चगेट येथे अजितराव घोरपडे, शिवाजीराव नाईक, विलासराव जगताप, राजेंद्रअण्णा देशमुख यांच्यासह माजी जिल्हा परिषद सदस्य तम्मणगौडा रवी पाटील, रणधीर नाईक, पलूसचे माजी नगरसेवक निलेश येसुगडे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार आहेत. त्यांच्याबरोबर अनेक पदाधिकारी देखील असणार आहेत. पक्षाचे अध्यक्ष, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा होणार आहे.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज