rajkiyalive

sangli news : सरपंचपदाच्या आरक्षणाने अनेकांचे नशीब उजळले तर कित्येकांना अपेक्षाभंग

sangli news : सरपंचपदाच्या आरक्षणाने अनेकांचे नशीब उजळले तर कित्येकांना अपेक्षाभंग : जिल्ह्यातील 796 ग्रामपंचायतींमध्ये सरपंचपदाच्या आरक्षणाकडे डोळा ठेवून बसलेल्या अनेकांचे नशीब उजळले तर कित्येकांना गुडघ्याला बांधलेल्या मंडळींचा अपेक्षाभंग झाला. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना 50 टक्के आरक्षण आहे, त्यानुसार आरक्षण सोडत काढलेल्या 696 पैकी 349 ग्रामपंचायतींवर महिला सरपंच होणार असल्याचे स्पष्ट झाले. जिल्ह्यातील 210 गावामध्ये सरपंचपद खुले झाले असून मोठ्या लोकसंख्येच्या गावात दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे.

sangli news : सरपंचपदाच्या आरक्षणाने अनेकांचे नशीब उजळले तर कित्येकांना अपेक्षाभंग

210 गावचे सरपंचपद खुले, 696 गावांच्या सरपंचांची आरक्षण सोडत

सरंपचपदाच्या आरक्षणाची सोडत बुधवारी प्रत्येक तालुक्यातील मुख्यालयाच्या ठिकाणी काढण्यात आली. तालुकानिहाय सरपंच पदे वेगवेगळे प्रवर्ग आणि महिलांसाठी पुढील पाच वर्षाकरीता (2025 ते 2030) आरक्षित झाली आहेत. जिल्ह्यात 696 ग्रामपंचायती असूनआरक्षण सोडतीत 50 टक्के महिला आरक्षण राहिले आहे. यामध्ये 349 सरपंचपद महिला राखीव असल्याने या सर्व ग्रामपंचायतींवर यानंतर महिलाराज आले. सर्वसाधारण सरपंच 420 ग्रामपंचायतमध्ये राहणार असून 210 गावातील सरपंच खुले झाले. ओबीसी 188, अनुसूचित जाती 83, अनुसूचित जमातीसाठी 5 ठिकाणी सरपंचपद आरक्षित झाले.

जत तालुक्यात सर्वाधिक 116 ग्रामपंचायतींचा समावेश आहे, याशिवाय वाळवा तालुक्यात 94 याशिवाय शिराळा 91, तासगांव 68, मिरज 64, कवठेमहांकाळ 59, आटपाडी 53, कडेगाव 54, पलूस 33 ग्रामपंचायतींचा समावेश राहिला.
जिल्हयातील बड्या गावांतील सरपंचपदाचे काय होणार याबाबत तर्कवितर्क लढविले जात होते. मिरज तालुक्यातील कवठेपिरान, कवलापूर, समडोळी, हरीपूर, मालगाव, नांदे्र येथील सरपंचपद खुले झाले. तासगावमधील येळावी, मणेराजुरी, मांजर्डे,

वाळव्यातील कासेगाव, वाटेगाव, ताकारी, बावची, येडेनिपाणी, भवानीनगर, जतमधील उटगी, माडग्याळ, शेगाव, मुचंडी, रेवनाळ, वळसंग, येळवी. पलूस तालुक्यातील दुधोंडी, नागराळे, तुपारी, शिराळ्यातील मांगले, चिखली, बिळाशी, खुसगाव, वाकुर्डे खुर्द, आरळा, सोनवडे. खानापुरमधील लेंगरे, साळशिंगे, रेणावी, बलवडी भाळवणी, पारे, कवठेमहांकाळ तालुक्यातील बोरगाव, हिंगणगाव, इरळी, शिरढोण, तिसंगी, नरसिंहगाव, हरोली, आरेवाडी व नांगोळे या गावातील सरपंच आरक्षण खुले झाल्याने निवडणुकीत रंगत येणार असल्याचे स्पष्ट झाले.

गेल्या काही वर्षापासून आरक्षणामुळे संधी न मिळाल्याने सर्वसाधारण गटातील इच्छुकांचे काय होते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार होते. आरक्षण सोडतीत अनेक जणांचे पत्ते कट झाले. तर काहींनी अपपेक्षितपणे लॉटरी लागली आहे. आरक्षण सोडतीसाठी तालुक्याच्या ठिकाणी ग्रामीण भागातील इच्छुकांसह हौश्या नवश्यांनी गर्दी केली होती.

याठिकाणी खुले सरपंचपद

मिरज तालुक्यातील कवठेपिरान, कवलापूर, समडोळी, हरीपूर, मालगाव, तासगावमधील येळावी, मणेराजुरी, मांजर्डे, वाळव्यातील कासेगाव, वाटेगाव, ताकारी, बावची, येडेनिपाणी, जतमधील उटगी, माडग्याळ, शेगाव, मुचंडी, रेवनाळ, वळसंग, येळवी. पलूसमधील दुधोंडी, नागराळे, तुपारी, शिराळ्यातील मांगले, चिखली, बिळाशी, खुजगाव, वाकुर्डे खुर्द, खानापुरमधील लेंगरे, साळशिंगे, रेणावी, बलवडी भाळवणी, पारे, कवठेमहांकाळ बोरगाव, हिंगणगाव, इरळी, शिरढोण, तिसंगी आरेवाडी व नांगोळे.

चौकट….
जिल्ह्यातील ग्रामपंचायती 696
महिला सरपंच संख्या 349
सर्वसाधारण सरपंच संख्या 420
खुले सरपंचपद 210
ओबीसी सरपंच 188
अनु. जाती 83
अन. जमाती संख्या 5

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज