pahalgam news : पहलगाममध्ये जिल्ह्यातील 24 जण अडकले जम्मू-काश्मीर मधील पहलगाम येथे दहशतवादी हल्ला झाला. सांगली जिल्ह्यातील अंदाजे 24 पर्यटक जम्मू-काश्मिर मध्ये आहेत. या नागरिकांची सर्व सुरक्षिततेची व्यवस्था घेण्यात आली असून हे सर्व नागरिक सुरक्षित आहेत. या नागरिकांना सांगली जिल्ह्यात लवकरात लवकर परत आणण्याकामी राज्य शासनातर्फे प्रयत्न सुरू असल्याचे जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी सांगितले.
pahalgam news : पहलगाममध्ये जिल्ह्यातील 24 जण अडकले
नागरिकांना जिल्ह्यात परत आणण्यासाठी प्रयत्न सुरु ः जिल्हाधिकारी
पहलगाम येथे दहशतवाद्यांनी हल्ला केला असून या ठिकाणी पर्यटक अडकले असल्यास त्याबाबतची माहिती मिळण्यास नागरिकांसाठी हेल्पलाईन श्रीनगर येथे स्थापन करण्यात आलेली आहे. पर्यटकामध्ये सांगली शहरातील 4, कडेगाव 5, पलूस 8, मिरज 7 असे एकूण 24 नागरिक आहेत. जिल्हा आपत्ती नियंत्रण कक्षाच्या माध्यमातून संपर्क केला असता हे पर्यटक सुरक्षित आहेत. काही पर्यटकांशी जिल्हाधिकारी काकडे यांनी स्वत: संपर्क केला असता त्यांनी सुरक्षित असल्याचे जिल्हाधिकारी काकडे यांनी सांगितले.
या अनुषंगाने सांगली जिल्ह्यातील कोणतेही नागरिक अडकले असल्यास जिल्हा आपत्ती नियंत्रण कक्षाच्या दूरध्वनी क्रमांकावर किंवा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा. तसेच स्थानिक तहसिल कार्यालय यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी काकडे यांनी केले आहे.
pahalgam-newspahalgam-news-पहलगाममध्ये-जिल्ह्य
श्रीनगर येथील संपर्क क्रमांक- फोन क्र. 0194-2463651 / 2457543 / 2483651, व्हॉटसप नंबर – 7780805144 / 7780938397 /7006058623.

Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.