rajkiyalive

sangli 12th nikal : जिल्ह्यात बारावीच्या पोरीच हुश्शार

sangli 12th nikal : जिल्ह्यात बारावीच्या पोरीच हुश्शार : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेबु्रवारीमध्ये घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा ऑनलाईन निकाल सोमवारी दुपारी जाहीर झाला. यंदा तब्बल एक महिना निकाल लवकर लागला. जिल्ह्याचा निकाल 93.39 टक्के लागला. उत्तीर्णामध्ये मुलींचे सर्वाधिक 96.52 टक्के प्रमाण आहे. शिराळा तालुक्याचा सर्वाधिक 97.67 टक्के तर जत तालुक्यात सर्वात कमी 90 टक्के निकालाची नोंद झाली.

sangli 12th nikal : जिल्ह्यात बारावीच्या पोरीच हुश्शार

जिल्ह्याचा 93.39 टक्के निकाल, शिराळा तालुक्याचा सर्वाधिक 97.67

विद्यार्थी आणि पालकांनी ऑनलाईन निकाल मोबाईलवरुन पाहिला. दरम्यान यंदाच्या बारावी परीक्षेच्या निकालात एक टक्क्याने वाढ झाल्याचे दिसून आले. यंदा बारावी आणि दहावीच्या बोर्ड परीक्षा लवकर घेण्यात आल्याने लवकरच निकाल लागणार अशी चर्चा होती. चालूवर्षी तब्बल महिनाभर लवकर बारावी निकाल जाहीर झाला आहे. परीक्षा मंडळाकडून रविवारी निकालाबाबत घोषणा करण्यात आल्याने उत्सुकता निर्माण झाली होती.

परीक्षा मंडळाने सोमवारी ऑनलाईन निकाल जाहीर केला. त्यामुळे विद्यार्थ्यांसह पालकांनी सुटकेचा निश्वास सोडला. कोल्हापूर विभागाचा निकाल 93.64 टक्के लागला असून कोल्हापूर जिल्ह्याचा सर्वाधिक 94.40 टक्के लागला. सातारा जिल्हा 92.76 तर सांगलीचा 93.39 टक्के निकाल आहे. यंदाच्या निकालात गतवर्षीपेक्षा एका टक्क्याने वाढ झाली.
जिल्ह्यात एकूण 325 कनिष्ठ महाविद्यालये आहेत. या विद्यालयात 16 हजार 168 मुले आणि 15 हजार 39 मुलीं अशा एकूण 31 हजार 207 विद्यार्थ्यांनी जिल्ह्यातील 51 परीक्षा केेंद्रांवर परीक्षा दिली. त्यापैकी 14 हजार 628 मुले आणि 14 हजार 517 मुली असे एकूण 29 हजार 145 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. उत्तीर्ण होण्यामध्ये मुलांची टक्केवारी 90.47 टक्के तर मुलींची 96.52 टक्के आहे. यंदाही निकालात मुलींनीच बाजी मारली आहे.

विज्ञान शाखेचा निकाल सर्वाधिक म्हणजेच 98.02 टक्के लागला आहे.

या शाखेत 17 हजार 910 विद्यार्थ्यांपैकी 17 हजार 557 जण उत्तीर्ण झाले. 353 विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले. कला शाखेचा निकाल 82.96 टक्के लागला आहे. या शाखेत 8 हजार 162 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यापैकी 6 हजार 772 जण उत्तीर्ण झाले. 1 हजार 390 विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले. वाणिज्य शाखेचा निकाल 94.28 टक्के लागला आहे. या शाखेत 4 हजार 201 विद्यार्थ्यांपैकी 3 हजार 961 जण उत्तीर्ण झाले. अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांची संख्या 240 आहे. व्यावसायिक अभ्यासक्रमाचा निकाल 92 टक्के लागला आहे. या शाखेत 900 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यापैकी 828 जण उत्तीर्ण झाले. 72 जण अनुत्तीर्ण झाले.

पुर्नपरीक्षार्थींचा निकाल 61.68 टक्के

बारावीच्या पुनपरीक्षार्थीच्या निकालामध्ये यंदा वाढ झाली. जिल्ह्यातून 1 हजार 271 विद्यार्थी रिपीटर होते. त्यातील 784 विद्यार्थी पास झाले. तर 487 विद्यार्थी नापास झाले. निकालाची टक्केवारी 61.68 टक्के आहे.

जिल्ह्यात शिराळा तालुक्याचा सर्वाधिक निकाल

जिल्ह्यात शिराळा तालुक्याचा सर्वाधिक 97.67 टक्के तर सर्वात कमी जत तालुक्याचा 90 टक्के निकाल लागला. आटपाडी 92.68, कडेगाव 96.63, कवठेमहांकाळ 96.67, खानापूर 94.47, मिरज 95.45, पलूस 96.21, मनपा 90.28, तासगाव 93.21 व वाळवा तालुक्याचा 96.85 टक्के निकाल लागला.

sangli-12th-nikal-only-the-12th-graders-in-the-district-are-smart

निकालाचा टक्का वाढला

गतवर्षी बारावीचा निकालाची टक्केवारी 92.63 होती. यंदा मात्र यामध्ये 0.76 टक्के वाढ झाली आहे. कोल्हापूर विभागात सांगली जिल्ह्याचा दुसरा क्रमांक आहे. तसेच कोल्हापूरचा दुसरा आणि सातारा जिल्ह्याचा तिसरा क्रमांक आला आहे. ज्या विद्यार्थ्यांना लेखी परीक्षेची उत्तरपत्रिकेतबाबत गुणपडताळणी करायची आहे. त्यांना दि. 6 मे ते 20 या कालावधीत ऑनलाईन अर्ज करता येणार आहे.

तालुकानिहाय निकाल
तालुका निकाल (टक्के)
आटपाडी 92.68
जत 90.00
कडेगाव 96.63
क.महांकाळ 96.67
खानापूर 94.47
मिरज 95.45
पलूस 96.21
मनपा 90.28
शिराळा 97.67
तासगाव 93.21
वाळवा 96.85
एकूण 93.39

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज