rajkiyalive

jayant patil news : जयंत पाटील यांच्या प्रयत्नाने इस्लामपूर आगाराला 5 नवीन बसेस

jayant patil news : जयंत पाटील यांच्या प्रयत्नाने इस्लामपूर आगाराला 5 नवीन बसेस: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष,माजी मंत्री आ.जयंतराव पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून इस्लामपूर आगाराला 5 नवीन बसेस मिळाल्या असून या नव्या 5 बसेसचे माजी मंत्री आ.जयंतराव पाटील यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले.सांगली विभाग नियंत्रक सुनिल भोकरे,इस्लामपूर आगार व्यवस्थापक दिलीप ठोंबरे,मिलिंद कुंभार,दिपक यादव यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे

jayant patil news : जयंत पाटील यांच्या प्रयत्नाने इस्लामपूर आगाराला 5 नवीन बसेस

पदाधिकारी,कार्यकर्ते व प्रवासी उपस्थित होते. इस्लामपूर आगारास नव्या बसेस मिळाल्याने वाळवा तालुक्या तील प्रवासांचा प्रवास अधिक सुखकर होणार असून प्रवाशांमधून याबद्दल समाधान व्यक्त करण्यात आले.

आ.जयंतराव पाटील यांनी राज्याचे परिवहन मंत्री ना.प्रताप सरनाईक यांना 14 फेब्रुवारी 2025 रोजी पत्र लिहून इस्लामपूर सह सांगली जिल्ह्यासाठी नव्या बसेसची मागणी केली होती. त्यानुसार सांगली जिल्ह्या स नव्या 40 बसेस मिळाल्या. आज त्यातील पहिल्या टप्प्यात 5 बसेस इस्लामपूर आगारा स मिळाल्या आहेत.

आ.जयंतराव पाटील यांनी सर्व बसेसचे पूजन करून श्रीफळ वाढविले. यावेळी त्यांनी इस्लामपूरहून अक्कलकोटला जाणार्‍या बस मधून प्रवासही केला. या प्रवासात त्यांनी सांगली विभाग नियंत्रक सुनिल भोकरे, व इस्लामपूर आगार व्यवस्थापक दिलीप ठोंबरे यांच्यासमवेत प्रवाशांना दिल्या जाणार्‍या विविध सुविधा व परिवहन विभागास येणार्‍या अडचणीबद्दल सविस्तर चर्चा केली.

jayant-patil-news-5-new-buses-to-islampur-depot-due-to-jayant-patils-efforts

याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे इस्लामपूर शहराध्यक्ष शहाजी पाटील,जिल्हा सर चिटणीस बाळासाहेब पाटील,महिला जिल्हाध्यक्षा सुस्मिता जाधव,माजी नगर सेवक खंडेराव जाधव,पिरअली पुणेकर,युवक तालुकाध्यक्ष संग्राम जाधव,महिला शहराध्यक्षा पुष्पलता खरात,आयुब हवलदार,मनिषा पेठकर,सुप्रिया पेठकर, संदीप माने,बाळासो कोळेकर,राहुल नागे, प्रविण पाटील आदी उपस्थित होते.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज