jayashri patil news : जयश्रीताईंच्या प्रवेशामुळे अनेक प्रभागात होणार भाजपची गोचीमहापालिका क्षेत्रात भाजप विरोधात लढत असलेला काँग्रेस पक्षातील मोठा गट जयश्रीताई पाटील यांच्या नेतृत्वाखाली भाजपमध्ये आला. यामुळे भाजपची ताकद वाढली खरी, पण महापालिकेच्या निवडणुकीत उमेदवारी देताना भाजपची गोची होणार असल्याचे चित्र आहे.
jayashri patil news : जयश्रीताईंच्या प्रवेशामुळे अनेक प्रभागात होणार भाजपची गोची
अनेक प्रभागात गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत आमने-सामने असलेले माजी नगरसेवक, पदाधिकारी आता शड्डू मारत आहेत. पण यामधील अनेकांना या निवडणुकीत उमेदवारीतून डच्चू मिळणार असल्याचे चित्र आहे.
महापालिकेच्या राजकारणात गेल्या अनेक वर्षांपासून भाजप विरूध्द काँग्रेसमधील स्व. मदनभाऊ पाटील गटात लढत असायची. मात्र या महापालिकेतील चित्र वेगळे असणार आहे. यावेळी स्व. मदनभाऊ पाटील गट काँग्रेसमधून बाजुला गेला आहे. त्यामुळे ही निवडणूक आता रंगतदार वळणावर असणार आहे. महापालिकेची 2018 मध्ये पंचवार्षिक निवडणूक झाली होती.
ही निवडणूक भाजपने स्वबळावर लढवली होती. तर काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसने आघाडी केली होती. या निवडणुकीत भाजपला एकहाती सत्ता मिळाली होती. तर काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस विरोधी पक्षात होते. त्यानंतर अडीच वर्षानंतर भाजपचे काही नगरसेवक फुटल्याने राष्ट्रवादीने महापौर तर काँग्रेसने उपमहापौरपद मिळवले होते.
या पंचवार्षिक निवडणुकीसाठी भाजपने जोरदार तयारी सुरू केली आहे. महाविकास आघाडी विरूध्द महायुती असा सामना होणार असल्याचे चित्र होते. पण राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार्या जयश्रीताई पाटील यांनी अचानकपणे भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे भाजपची मनपा क्षेत्रात ताकद वाढली आहे. पूर्वीपासून प्रतिस्पर्धी असलेला स्व. मदनभाऊ पाटील गट आता भाजपबरोबर काम करणार आहे.
या विरोधात आता काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष एकत्र येणार असल्याचे चित्र आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाची भाजपबरोबर आघाडी होणार का? यावर देखील प्रश्नचिन्ह आहे. पण सध्यस्थितीला भाजपची उमेदवारीवरून मोठी अडचण काही प्रभागात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे भविष्यात प्रभागात उमेदवारी देताना भाजप नेत्यांची कसरत होणार आहे.
jayashri-patil-news-bjps-entry-will-lead-to-a-landslide-in-many-wards
भाजप नेतेमंडळींनी 2018-23 मधील सभागृहातील माजी नगरसेवकांना उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला तर दोन्ही बाजुने अनेकांची कोंडी होण्याची शक्यता दाट आहे. प्रभाग क्रमांक एकमध्ये माजी उपमहापौर प्रशांत पाटील उमेदवारीसाठी इच्छूक आहेत. त्या जयश्रीताई पाटील गटाचे आहेत. तर दुसरीकडे धीरज सूर्यवंशी यांचे बंधू ऋषिकेश सूर्यवंशी व आ. सुधीर गाडगीळ यांचे विश्वासू विश्वजीत पाटील इच्छूक आहेत.
या ठिकाणी उमेदवारी देताना भाजपची कोंडी होणार आहे. याबरोबर प्रभाग क्रमांक नऊमध्ये माजी नगरसेवक संतोष पाटील व अतुल माने, प्रभाग क्रमांक अकरामध्ये कांचन कांबळे व सर्जे, प्रभाग क्रमांक सतरामध्ये माजी उपमहापौर प्रशांत पाटील-मजलेकर व मावळते नगरसेवक लक्ष्मण नवलाई, माजी नगरसेविका गीतांजली ढोपे-पाटील व माजी नगरसेविका मृणाल पाटील यांच्यासह अनेक प्रभागात उमेदवारीवरून भाजपमध्ये संघर्ष होण्याची शक्यता आहे.
गत नगरसेवकांना उमेदवारीचा ठरणार फॉर्म्युला…
जयश्रीताई पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने उमेदवारीवरून मदनभाऊ गट व जुन्या भाजपमध्ये वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे 2018 मध्ये सभागृहात असलेल्या नगरसेवकांना संधी देऊन इतर जागांवर चर्चा करण्याचा फॉर्म्युला भाजपमध्ये ठरण्याची शक्यता आहे. प्रायोगिक तत्वावर तशी बोलणी देखील भाजपचे नेते व जयश्रीताई पाटील यांच्यात झाली असल्याची चर्चा आहे.
या ठिकाणी होणार अडचणी..
प्रभाग क्र. जयश्रीताई गट भाजप
1 प्रशांत पाटील / ऋषिकेश सूर्यवंशी
विश्वजीत पाटील
3 सचिन जाधव / संदीप आवटी
9 संतोष पाटील / अतुल माने
10 शेवंता वाघमारे / जगन्नाथ ठोकळे
11 कांचन कांबळे / विलास सर्जे
13 उदय पाटील / अजिंक्य पाटील
17 प्रशांत पाटील-मजलेकर / लक्ष्मण नवलाई
मृणाल पाटील / गीतांजली ढोपे-पाटील

Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.